३२७ कोटी रुपयांचा आराखडा बीड जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:12 AM2019-01-16T00:12:48+5:302019-01-16T00:14:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सन २०१९-२० या वर्षासाठी ...

Rs. 327 crores approved in Beed District Planning Meeting | ३२७ कोटी रुपयांचा आराखडा बीड जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर

३२७ कोटी रुपयांचा आराखडा बीड जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देपंकजा मुंडे : दुष्काळी उपाययोजनेसह क्रीडा विकासाला देणार चालना : मेटे, मुंडे गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी सन २०१९-२० या वर्षासाठी ३२७ कोटी ५७ लाख रुपयांचा आराखड्याला ८१ कोटीच्या वाढीव निधीसह मंजूरी देण्यात आली आहे. मंजूर आराखडा १७ जानेवारी रोजी वित्तमंत्र्यांच्या पुढे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
या बैठकीस खा. डॉ.प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प. सिईओ अमोल येडगे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. संगीता ठोंबरे, आ. आर.टी देशमुख, आ. सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार यांच्यासह नियोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी मोठी तरतूद केल्याने जिल्हयातील शाळांना नवे रुप प्राप्त होईल. यापुढे अंगणवाडी बांधकामासाठी प्रीकास्टींग तंत्राचा वापर करण्यात येईल, कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. या प्रसंगी खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हयातील क्रीडा विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करु असे सांगितले. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न जिल्हयात गंभीर असल्याची बाब सांगितली.
बोअरला परवानगी नाकारावी
बैठकीनंतर पत्रकारपरिषदेमध्ये पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांसोबत,विविध क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आराखड्यात अधिक तरतूद केल्याचे सांगितले. तलावांमधील गाळ काढण्यात येणार असून गरजेनूसार चारा छावण्या सुरु केल्या जातील. भूजल पातळीविषयी खालावल्याने बोअर घेण्यासाठी परवानगी नाकारली पाहिजे, प्रशासनाने याविषयी निर्णय घ्यावा. जलयुक्त शिवार घोटाळ््यासंदर्भात अधिकाऱ्यांना अटक केले जात नाही या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. प्रशासनस्तरावर कारवाई केली जाईल. यावेळी खा.डॉ.प्रीतम मुंडे व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह उपस्थित होते.
त्यांना विकासाचे महत्त्व वाटत नसेल
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासाचे महत्त्व त्यांना वाटत नसेल म्हणून ते गैरहजर असतात, ते फक्त विधीमंडळात बोलतात, तसेच यापुर्वीच्या देखील अनेक बैठकांना ते गैरहजर होते अशी टिपणीही त्यांनी केली.
शिवसेना वाढावी.. राष्टÑवादी कमी व्हावी..
उद्धव ठाकरे यांच्या बीड जिल्हा दौºयासंदर्भात विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी कमी होऊन शिवसेना वाढली तर आनंद आहे. भाजप मात्र कमी होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्यातील शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपवा, असे आवाहन ठाकरे यांनी त्या सभेत केले होते.

Web Title: Rs. 327 crores approved in Beed District Planning Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.