कामावरून घरी परतताना सहकाऱ्याकडूनच महिला पोलीस कर्मचा-याचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:02 AM2019-05-27T01:02:21+5:302019-05-27T01:02:24+5:30

मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून आपल्या सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडली.

On returning from work, the molestation of a woman police employee by the co-worker | कामावरून घरी परतताना सहकाऱ्याकडूनच महिला पोलीस कर्मचा-याचा विनयभंग

कामावरून घरी परतताना सहकाऱ्याकडूनच महिला पोलीस कर्मचा-याचा विनयभंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून आपल्या सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता व आरोपी हे आठ महिन्यांपूर्वी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत होते, असे समजते.
शेख शौकत शेख मुन्सी (३३) असे आरोपी पोलीस नाईकचे नाव असून तो मोटार परिवहन विभागात कार्यरत आहे.
शौकत व पीडिता हे बीड शहरातीलच एका पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत होते. साधारण आॅक्टोबर महिन्यात शौकतने पीडितेचा मोबाईल घेऊन त्यातील तिचे सर्व फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर तिला तो ब्लॅकमेल करू लागला.
सोशल मीडियावरून जवळीक साधू लागला. हा त्रास वाढल्याने पीडितेने आपल्या पोलीस पतीला सांगितला. त्यानंतर शौकतविरोधात तक्रार दिली. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि शिवलाल पुर्भे यांनी यात शौकतचा जबाब घेऊन कारवाई केली. त्यानंतर आपण तिला त्रास देणार नसल्याचे लेखी दिले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शौकतची बदली अंभोरा पोलीस ठाण्यात केली.
दरम्यान, तरीही त्याने पीडितेचा पाठलाग करणे सोडले नाही. १६ मे रोजी रात्री ८ वाजता ड्यूटी संपवून पीडिता दुचाकीवरून घरी जात होती. याचवेळी जिल्हा रूग्णालयाच्या पाठीमागील संगम हॉलजवळ शौकतने पीडितेची दुचाकी अडविली. तिला दुचाकीवरून खाली ओढत ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत विनयभंग केला. पीडितेने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि आरडाओरडा केला. तोपर्यंत शौकतने तेथून पळ काढला.
हे प्रकरण ठाण्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे ही तक्रार केली. त्यांनी विशाखा समितीपुढे हे प्रकरण मांडले. चौकशी करून २५ मे रोजी सायंकाळी शहर ठाण्यात शौकतविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
शहर पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला. माध्यमांनी याबाबत शहर पोलिसांशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच रविवारीही पीएसओंनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. या सर्व प्रकारावरून शहर पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचे दिसून येते. रविवारी उशिरापर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नव्हती. त्यामुळे शहर पोलीस संशयाच्या भोव-यात अडकले आहेत.
आरोपी पोलीस तीन लेकरांचा बाप
शेख शौकत याची पत्नी शिक्षिका असल्याचे सांगण्यात आले. त्याला तीन अपत्ये आहेत.
पीडितेचा पतीही पोलीस असून तो सुद्धा बीडमधीलच एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

Web Title: On returning from work, the molestation of a woman police employee by the co-worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.