दुष्काळ तोंडावर असताना आरक्षित पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:19 AM2018-10-15T00:19:59+5:302018-10-15T00:20:31+5:30

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

Reserved water leak while drought is in the mouth | दुष्काळ तोंडावर असताना आरक्षित पाण्याचा उपसा

दुष्काळ तोंडावर असताना आरक्षित पाण्याचा उपसा

Next
ठळक मुद्देहजारो मोटार रात्रंदिवस चालू : कार्यवाही शून्य, माजलगाव धरण भर पावसाळ्यात वजा ५ टक्के

पुरुषोत्तम करवा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुढील काळात माजलगाव तालुक्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. माजलगाव धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणात सध्या असलेले पाणी पुढील चार ते पाच महिने केवळ पिण्यासाठी पुरु शकते, अशी परिस्थिती असताना धरण बॅकवॉटरवरून मोठ्या प्रमाणावर मोटारीद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यावर अंकुश न ठेवल्यास मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
माजलगाव धरण हे बीड, माजलगाव आणि किमान ७० ते ८० गावांसाठी वरदान आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या या धरणामुळे सुटली असली तरी यावर्षी पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्यामुळे धरण भर पावसाळ्यात जोत्याखाली आहे.
असे असले तरी सध्या धरणात असलेल्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याची गरज पुढील किमान ४ ते ५ महिने भागू शकते कारण उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि पाणीपुरवठा वगळता धरणाच्या पाण्यातून होत असलेला बेसुमार पाणी उपसा हा भविष्यातील गंभीर परिस्थितीचे करण ठरू लागले आहे. प्रशासनाच्या वतीने उपलब्ध असलेला जलसाठा हा केवळ पिण्यासाठी आरक्षित केलेला असताना बेसुमार उपशामुळे धरणाची पातळी दिवसेंदिवस कमालीची खालावत चालली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ही वजा ५ टक्के इतकी घटली असून शनिवारी पाणी पातळी ही ४२५.५९ मी. इतकी होती. तर उपयुक्त साठा हा १२६.७० दलघमी इतका कमी असल्यामुळे आता शेती व परळी येथील थर्मलला पाणी देणे आता शक्य होणार नाही. उपलब्ध साठा केवळ आणि केवळ पिण्यासाठीच पुरु शकतो, अशी माहिती धरण अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.
कार्यवाहीसाठी पथक नियुक्त
माजलगाव धरणातून व इतर जल साठ्यांमधून पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, महावितरण, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व अभियंते यांची बैठक घेण्यात येऊन पाणी संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची समीक्षा करण्यात आली. महसूल, पोलीस, पाटबंधारे, महावितरणच्या लोकांचे एक पथक तयार करण्यात आले असून,कार्यवाही बाबतचे पूर्ण अधिकार त्यांना देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांनी दिली.
नदी पात्रातूनही उपसा
माजलगाव धरणा खालोखाल सिंदफणा नदी पात्रातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू असून, नदी पत्रातील पाणी चोरीवर देखील कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

Web Title: Reserved water leak while drought is in the mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.