बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना; बापानेच केला मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 09:01 PM2019-01-21T21:01:25+5:302019-01-21T21:02:16+5:30

आरोपीला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षापूर्वीच त्याच्या त्रासाला कंटाळून सोडून गेली.

Rape on minor girl by her father;incident happen in Beed | बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना; बापानेच केला मुलीवर अत्याचार

बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना; बापानेच केला मुलीवर अत्याचार

Next

बीड : पोटच्या अवघ्या १२ वर्षीय मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी वासनांध बापावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी बाप हा ३५ वर्षाचा असून पीडिता ही सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपीला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षापूर्वीच त्याच्या त्रासाला कंटाळून सोडून गेली. त्यामुळे घरी दोन मुली आणि एक मुलगा रहात होता. पीडिता ही सर्वात मोठी असल्याने शिक्षण घेण्याबरोबरच घरचे काम करीत असे. मात्र बापाला दारूचे व्यसन असल्याने तो पीडितेला मारहाण करीत असे.

अनेकवेळा त्याने रात्रीच्यावेळी जिवे मारण्याची धमकी देत पोटच्या मुलीवरच अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने आपल्या चुलतील सांगितला. त्यानंतर चुलतीने त्या बापाला चांगलेच सुनावले. तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याने पुन्हा पीडितेसोबत शरिरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध केल्याने तो संतापला. त्यामुळे दुपारच्या सुमारास त्याने पीडितेसह तिची लहान बहिण व भावाला मारहाण करण्यास सुरूवात केली.

याचवेळी गावातील काही नागरिकांनी ही माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यांनी तात्काळ धाव घेत आरोपीला ताब्यात घेत पीडितेची बाजू समजून घेतली. त्यानंतर पीडितेने आपल्या पित्याविरोधात रितसर फिर्याद नोंदविली आहे. पोह.भागवत शेलार यांनी फिर्याद घेतली असून परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Rape on minor girl by her father;incident happen in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.