परळीत पोलिसाचा खून; १२ तासांमध्ये दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:39 AM2018-06-26T00:39:04+5:302018-06-26T04:25:07+5:30

परळी शहरालगत अनोळखी मृतदेह आढळला. खात्री केला असता तो रेल्वे पोलिसाचा असल्याचे समजले. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज निघाला. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाताही सुगावा नव्हता. अशा परिस्थितीतही कौशल्य दाखवत अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी या खुनाचा तपास अवघ्या १२ तासांमध्ये पूर्ण केला. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या.

Polly's murder in Parli; Both were arrested in 12 hours | परळीत पोलिसाचा खून; १२ तासांमध्ये दोघांना अटक

परळीत पोलिसाचा खून; १२ तासांमध्ये दोघांना अटक

Next
ठळक मुद्देटायरच्या खुणावरून लागला छडा; रिक्षातून शहराबाहेर घेऊन जात केली बेदम मारहाण

बीड / परळी : परळी शहरालगत अनोळखी मृतदेह आढळला. खात्री केला असता तो रेल्वे पोलिसाचा असल्याचे समजले. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज निघाला. मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाताही सुगावा नव्हता. अशा परिस्थितीतही कौशल्य दाखवत अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी या खुनाचा तपास अवघ्या १२ तासांमध्ये पूर्ण केला. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या.

परळी -अंबाजोगाई रस्त्यालगत एका हॉटेलसमोर ४० वर्षीय इसमाचा मृतदेह सकाळी वॉकला जाणाºया नागरिकांना दिसला. घाबरुन त्यांनी तात्काळ परळी शहर पोलिसांना माहिती दिली. त्याप्रमाणे शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे, सहायक पो. नि. डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार यांनी घटनेचा पंचनामा केला.

या मृतदेहाची ओळख पटविण्याबरोबरच मृत्यूचे कारण शोधणे पोलिसांसाठी आव्हान होते. कस्तुरे यांनी ही माहिती अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांना दिली. त्यांनी पथकासह धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. काही लोकांना विचारले असता हा मृतदेह नागनाथ मुंडे (रा. वडगाव, ता. जळकोट, जि. लातूर) यांचा असल्याचे समजले. ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना देऊन बोलावण्यात आले. शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली.

सायंकाळच्या सुमारास ऋषिकेश उर्फ सचिन बंडू फड (२१), गणेश सुभाष मुंडे (२३) (दोघेही रा. कन्हेरवाडी) या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि संपूर्ण घटनाक्रम त्यांनी कथन केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक अजित बोºहाडे, स्था. गु. शा. चे पो. नि. घनश्याम पाळवदे, पो. नि. उमेश कस्तुरे, दरोडाचे सपोनि गजानन जाधव, डोंगरे, पो. उप नि. वाघमारे, सचिन सानप, भास्कर केंद्रे, नागरगोजे, पवार, बांगर, तोटेवाड, बुट्टे आदींनी केली.

अशी घडली घटना
नागनाथ मुंडे हे उदगीर येथे आऊटपोस्टवर कार्यरत होते. सुटी संपवून ते पुन्हा रुजू होण्यासाठी २२ जून रोजी परळी येथे आले. २३ तारखेला रात्री ८.३० वाजेपर्यंत ते परळीत होते. त्यानंतर ते बसस्थानक परिसरात गेले. तेथून रेल्वेस्थानकात जाण्यासाठी गणेश व सचिनच्या रिक्षामध्ये ते बसले.
रेल्वे स्थानकात सोडण्यास त्यांनी सांगितले. परंतु बाजूलाच रेल्वेस्थानक असल्याने त्यांनी नकार दिला. यावर परस्परांमध्ये बाचाबाची झाली.  याचाच राग मनात धरुन आरोपींनी मुंडे यांना रिक्षातून अंबाजोगाई रोडवर नेले. तेथे त्यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तसेच सोडून आरोपींनी पलायन केले.

पंचनामा करतेवेळी आरोपी घटनास्थळीच
परळी शहर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत होते. यावेळी जमलेल्या गर्दीमध्ये दोघेही आरोपी तेथेच होते. कर्मचारी बांगर यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्या बोलण्यामध्ये भीती दिसली. परंतु त्यांना त्या वेळेस जास्त संशय बळावला नाही. तपासानंतर या दोघांची नावे निष्पन्न होताच बांगर यांनी घडलेला प्रकार सांगितला.

टायरच्या खुणा ठरल्या तपासाचा केंद्रबिंदू
मारेकºयांनी घटनास्थळी कसलाच पुरावा ठेवलेला नव्हता. बोºहाडे यांनी पाहणी केली असता त्यांना रिक्षाच्या टायरच्या खुणा आढळून आले. त्याप्रमाणे त्यांनी रात्री चालणाºया सर्व रिक्षांची चौकशी केली असता गणेश व सचिनबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर दोघांनाही कन्हेरवाडी परिसरातील एका डोंगरातून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.

दोघेही अट्टल गुन्हेगार
सचिन व गणेश हे दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. रेल्वे स्थानकात जाऊन चोरी, मारामारी असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. मुंडे यांनाही स्थानकात मारहाण करुन त्यांना लुटण्यासाठी अंबाजोगाई रोडवर नेले होते. परंतु त्यांच्या खिशात काहीच न सापडल्याने व मुंडे यांच्याकडून शिवीगाळ झाल्याचा राग मनात धरुन त्यांनी हे कृत्य केल्याचे कबूल केले.

Web Title: Polly's murder in Parli; Both were arrested in 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.