पायाभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:13 AM2019-02-06T00:13:39+5:302019-02-06T00:15:03+5:30

बीड जिल्ह्यातील जनतेचे पालकत्व आपण स्वीकारले असून जिल्हावासियांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून आजतागायत कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला. आगामी काळातही निधी उपलब्ध करून देऊ , असे आश्वासन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

Pankaja Munde is committed to providing infrastructure | पायाभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध - पंकजा मुंडे

पायाभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध - पंकजा मुंडे

googlenewsNext
ठळक मुद्देपशुवैद्यकीय रुग्णालय इमारत, नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील जनतेचे पालकत्व आपण स्वीकारले असून जिल्हावासियांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून आजतागायत कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला. आगामी काळातही निधी उपलब्ध करून देऊ , असे आश्वासन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
अंबाजोगाईत पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत, नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन, मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आ. प्रा. संगीता ठोंबरे, रमेशराव आडसकर, रमाकांत मुंडे, नेताजी देशमुख, कमलाकर कोपले, हिंदुलाल काकडे, महिला आयोगाच्या सदस्या गया कराड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, अंबाजोगाईच्या रुग्णालयासाठी गेल्या चार वर्षात १०० कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यासोबतच विविध शासकीय इमारतींचे नूतनीकरण व नव्या इमारती सज्ज झाल्या आहेत. आगामी काळातही अंबाजोगाईकरांना झुकते माप देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना आ. संगीता ठोंबरे म्हणाल्या, सामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. कोणताही विकास टप्प्याटप्प्याने होत असतो. अंबाजोगाईच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून आणला. ती सर्व कामे दर्जेदार झाली असून शहराच्या वैभवात भर पडली असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी रमेशराव आडसकर यांचेही भाषण झाले.

Web Title: Pankaja Munde is committed to providing infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.