बीड जिल्ह्यात ‘हमारे दो’कडे वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:07 AM2018-05-24T01:07:49+5:302018-05-24T01:07:49+5:30

बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Our district has increased in Beed district | बीड जिल्ह्यात ‘हमारे दो’कडे वाढला कल

बीड जिल्ह्यात ‘हमारे दो’कडे वाढला कल

Next
ठळक मुद्देशहरासह ग्रामीण कुटुंबांमध्ये जागरुकता

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या. औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, काही ठिकाणी पुरेशा सुविधांचा अभाव अशी परिस्थिती असतानाही १६४३ शस्त्रक्रिया यशस्वी करत ‘छोटेकुटुंब, सुखी कुटुंब ही बिरुदावली’ रुजविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलमध्ये ग्रामीण भागात १०४८ व शहरी भागात ४६४ अशा एकूण १५१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या. या तुलनेत चालू वर्षात ग्रामीण भागात १००५ तर शहरी भागात ६३८ अशा १६४३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष म्हणजे यात नसबंदीच्या ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात ४ शस्त्रक्रिया ग्रामीण तर २ शहरी भागात झाल्या आहेत.
एकीकडे राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असताना काही वैद्यकी अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचे दिसत आहे. एकही शस्त्रक्रिया न करणा-या संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

दोन अपत्यांवर ९७१
यशस्वी शस्त्रक्रिया
चालु वर्षात एप्रिलमध्ये १६४३ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी दोन अपत्यांवर ९७१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात ग्रामीण भागात ६०६ तर शहरी भागात ३६५ शस्त्रक्रिया झाल्या. ग्रामीणमध्ये हे प्रमाण दुप्पट आहे.

थोरात, राऊत यांचे विशेष योगदान
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. सदाशिव राऊत यांचा या मोहिमेत विशेष सहभाग राहिंला आहे. डॉ. थोरात यांनी चालु वर्षात एप्रिलमधील १६४७ पैकी २०० तर १ मे ते २३ मे या कालावधीत तब्बल ५४९ अशा एकूण ७४९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर डॉ. राऊत यांनी एप्रिल व मे कालावधीत ६३९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांमध्ये डॉ. थोरात व डॉ. राऊत यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. इतर वैद्यकीय अधिकारीही कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी करत आहेत.

निपाणी जवळका येथे सर्वाधिक शस्त्रक्रिया
जिल्ह्यात निपाणी जवळका प्रा.आरोग्य केंद्रात १०३, जातेगावमध्ये ६९, वडवणीत ६५, पात्रुड ५८, अंमळनेरमध्ये ५८, भोगलवाडीत ५६ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे.

भरपाईचीही तरतूद
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया असफल झाल्यास ३० हजार रुपये, गुंतागुंत झाल्यास भरपाईची तरतूद आहे. दुर्दैवाने जर मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये भरपाईची देण्यात येते. मागील वर्षी दहा शस्त्रक्रिया असफल ठरल्या. हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

नियोजनामुळे शक्य
जिल्ह्यातील बंद शस्त्रक्रियागृह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन सुरु केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना टाक्याच्या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. तर एम. डी. डॉक्टरांना लॅप्रोस्कोपीचे प्रशिक्षण देण्यात आले.

जागरुकता वाढली
एप्रिलमध्ये १०८३ बिनटाका व टाक्याच्या ५५४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ग्रामीण भागात जागरुकता वाढली आहे. लोक स्वत: शस्त्रक्रियेसाठी येत आहेत. १५ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही शस्त्रक्रिया न झाल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. लवकरच कारणे कळतील.
- राधाकृष्ण पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

Web Title: Our district has increased in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.