तिपटवाडीचे बापलेक वर्षासाठी हद्दपार; गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 07:17 PM2018-02-07T19:17:20+5:302018-02-07T19:17:40+5:30

गावात दहशत निर्माण करणार्‍या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या बापलेकाला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भगवान यशवंत तिपटे व संतोष भगवान तिपटे (रा.तिपटवाडी ता.बीड) अशी या गावगुंड बापलेकाची नावे आहेत.

one year Execution for Tipatwadi's father-son; There are serious forms of crime filed against them | तिपटवाडीचे बापलेक वर्षासाठी हद्दपार; गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दाखल

तिपटवाडीचे बापलेक वर्षासाठी हद्दपार; गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दाखल

googlenewsNext

बीड : गावात दहशत निर्माण करणार्‍या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या बापलेकाला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भगवान यशवंत तिपटे व संतोष भगवान तिपटे (रा.तिपटवाडी ता.बीड) अशी या गावगुंड बापलेकाची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी केली.

गावासह परिसरात दहशत निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या गावगुंडांसह गुन्हेगारांच्या टोळ्या जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या कारवार्इंवर जी.श्रीधर यांनी भर दिला आहे. दहशत पसरविणार्‍या गुंडांची नावे मागवून त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही ठाणे प्रमुखांना दिलेले आहेत. त्याप्रमाणे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी संतोष व भगवान तिपटे या दोघांचा दोन वर्षासाठीचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी याचा पाठपुरावा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी याची चौकशी केली. त्याप्रमाणे या दोघा बापलेकाला वर्षासाठी हद्दपारीची कारवाई झाली.

दरम्यान, या दोघांवर मारामारी, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापती करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार अटक करूनही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. शेवटी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

Web Title: one year Execution for Tipatwadi's father-son; There are serious forms of crime filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.