बीड पोलिसांकडून महामानवास ४० किलोंचा आकर्षक हार अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:24 AM2019-04-15T00:24:16+5:302019-04-15T00:25:17+5:30

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त तब्बल ४० किलोचा आकर्षक हार अर्पण करण्यात आला.

Offering attractive necklace of 40 quarters of Behad police from the main house | बीड पोलिसांकडून महामानवास ४० किलोंचा आकर्षक हार अर्पण

बीड पोलिसांकडून महामानवास ४० किलोंचा आकर्षक हार अर्पण

googlenewsNext

बीड : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त तब्बल ४० किलोचा आकर्षक हार अर्पण करण्यात आला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याजवळ बंदोबस्तासाठी शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असतात. रविवारीही होते.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी रात्री बारा वाजताच ज्योत घेऊन महामानवास अभिवादन केले. त्यानंतर रविवारी सकाळी बीड पोलिसांच्या वतीने तब्बल ४० किलोचा हार महामानवास अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि अमोल धस यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Offering attractive necklace of 40 quarters of Behad police from the main house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.