रागात १०० क्रमांक डायल केला अन् पोलिसांची रात्रभर धावपळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:06 AM2019-02-11T00:06:53+5:302019-02-11T00:07:50+5:30

व्यक्तीगत वादातून सहकाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याने आपला ट्रक रस्त्यात आडविला आणि मारहाण करून १८०० रूपये लुटल्याची तक्रार पोलीस हेल्पलाईनच्या १०० या क्रमांकावर रविवारी पहाटे २ वाजता दिली.

The number was dialed and the police ran overnight ... | रागात १०० क्रमांक डायल केला अन् पोलिसांची रात्रभर धावपळ...

रागात १०० क्रमांक डायल केला अन् पोलिसांची रात्रभर धावपळ...

Next
ठळक मुद्देवडवणीजवळील प्रकार : म्हणे, रस्त्यात ट्रक अडवून मारहाण करीत लुटले

बीड / वडवणी : व्यक्तीगत वादातून सहकाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याने आपला ट्रक रस्त्यात आडविला आणि मारहाण करून १८०० रूपये लुटल्याची तक्रार पोलीस हेल्पलाईनच्या १०० या क्रमांकावर रविवारी पहाटे २ वाजता दिली. त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. संबंधिताला पकडून खात्री केल्यानंतर त्याने खरा प्रकार सांगितला. हा प्रकार रविवारी पहाटे २ ते ६ यावेळेत बीड-वडवणी रस्त्यावर घडला. हा प्रकार खोटा असल्याचे सिद्ध झाले असले तरी पोलीस सतर्क असल्याचे दिसून येते.
चंद्रकांत आंधळे (रा.जिरेवाडी ता.पाथर्डी जि.अ.नगर) असे फोन करणाºया ट्रक चालकाचे नाव आहे. चंद्रकांत व त्याचा अन्य एक ट्रकचालक वडवणी जवळील एका धाब्यावर बसले. तेथे जेवणासह मद्यपान केले. याचवेळी दुसºया ट्रकचा मालक भगवान श्रीमंत बडे हे तिथे आले. मद्यपान केलेले असल्यामुळे बडे यांनी दोन्ही चालकांना थोडे धारेवर धरले. हाच राग मनात धरून चंद्रकांतने वडवणीच्या थोडे पुढे आल्यावर रागाच्या भरात १०० क्रमांकवर कॉल केला. आणि मला रस्त्यात आडवून कारमधील (एमएच १६ बी ३१९८) तिघांनी मारहाण करून १८००० हजार रुपये लुटल्याची माहिती दिली. तसेच ही कार बीडकडे आल्याचे सांगितले.
पोलिसांनी तात्काळ बार्शी नाका परिसरात नाकाबंदी केली. कार दिसताच कारसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांना नियंत्रण कक्षात आणून त्यांची चौकशी केली. यामध्ये या घटनेचे आपल्याला काहीच माहिती नसल्याचे बडे यांनी पोलिसांना सांगितले. तर दुसºया बाजुला संबंधित ट्रकचालकाला संपर्क साधून ताब्यात घेतले. त्याचीही चौकशी केली. वडवणी पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सांगितले. मात्र असे काहीच झाले नसल्याचे समजले.
पोलिसांनी चंद्रकांतला विश्वासात घेत माहिती विचारली. त्यानंतर त्याने बडे याने आपल्याला झापल्यामुळे आलेल्या रागातून त्यांना कायद्याच्या कचाट्यात गुंतविण्यासाठी आपण हा कॉल केल्याचे कबुल केले. हा प्रकार खोटा असल्याचे समजताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वडवणीचे सपोनि सुरेश खाडे, मनोज जोगदंड, सी.के.माळी, संजय राठोड, राम बारगजे, विठ्ठल गित्ते, महेश गर्जे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: The number was dialed and the police ran overnight ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.