बीडमधील अर्भक प्रकरण; पोलिसांनी चार गावांमधून घेतली प्रसूतीची माहिती; रूग्णालयांनाही पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 04:38 PM2019-04-30T16:38:03+5:302019-04-30T16:38:51+5:30

अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती कसलाच धागादोरा लागलेला नाही.

new born baby found case of Beed; police getting Information about delivery in four villages; Letters to the hospitals also | बीडमधील अर्भक प्रकरण; पोलिसांनी चार गावांमधून घेतली प्रसूतीची माहिती; रूग्णालयांनाही पत्र

बीडमधील अर्भक प्रकरण; पोलिसांनी चार गावांमधून घेतली प्रसूतीची माहिती; रूग्णालयांनाही पत्र

Next

बीड : तालुक्यातील कपीलधारवाडी येथे सोमवारी तीन दिवसांचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील गावांमधून प्रसूती झालेल्या महिलांची माहिती घेतली. तसेच सर्व स्त्री रूग्णालयांसह जिल्हा रूग्णालयाला पत्र देऊन माहिती मागविली आहे. अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती कसलाच धागादोरा लागलेला नाही.

बीडपासून १० किमी अंरावर असलेल्या कपीलधार वाडी येथे काटेरी झाडाच्या आळ्यात तीन दिवसांचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले होते. त्याला ताब्यात घेत ग्रामस्थांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती ठणठणीत असून देखभालीसाठी महिला पोलीस आणि परीचारिका नियूक्त केल्या आहेत. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पालीचे पोलीस पाटील वैजिनाथ नवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

दरम्यान, मंगळवारी सकाळीच पोलिसांनी कपीलधारवाडीसह मंजेरी, मांजरसुंबा, पाली, कोळवाडी, कपीलधार वाडी, आहेरवडगाव या गावांमध्ये जावून मागील चार दिवसांत प्रसुती झालेल्या महिलांची माहिती घेतली. तसेच जिल्हा रूग्णालय, परिसरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह बीड शहरातील सर्व स्त्री रूग्णालयांना पत्र पाठवून मागील चार दिवसांत जन्मलेल्या मुलींची यादी मागविली आहे. अद्यापर्यंत मात्र पोलिसांच्या हाती कसलीच माहिती मिळालेली नाही. हा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. तपास अंमलदार पोह जयसिंग वाघ म्हणाले, परिसरातील गावांची चौकशी केली आहे. रूग्णालयांनाही पत्र पाठवून मागील चार दिवसांत जन्मलेल्या मुलींची यादी मागविली आहे.

Web Title: new born baby found case of Beed; police getting Information about delivery in four villages; Letters to the hospitals also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.