पालिका, बाजार समितीच्या गाळ्यांना चोरून वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:46 AM2019-01-19T00:46:51+5:302019-01-19T00:47:38+5:30

वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे.

The municipality, the market committee stole the grids and power | पालिका, बाजार समितीच्या गाळ्यांना चोरून वीज

पालिका, बाजार समितीच्या गाळ्यांना चोरून वीज

Next
ठळक मुद्देरॅकेट सक्रिय : सहा वर्षांपासून वीजचोरी, कारवाईत मात्र ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’; चौकशीची मागणी

माजलगाव : वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी वीज कंपनीने कारवाई करून गाळा धारकांना प्रत्येकी पाच, सहा हजार रु पये दंड करत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम केले आहे. वास्तविक आजही आकडा टाकून वीजचोरी सुरु असून वीज कंपनीने मात्र जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक केली आहे.
ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या प्रमाणात आकडे टाकून वीज चोरी होत असताना कंपनीचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मोंढ्यातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळील विद्युत खांबावर चक्क आकडा टाकण्यात आला आहे. पालिका कॉम्प्लेक्सच्या गळ्याला फ्यूज ठोकून तेथून चोरीची वीज पालिका, बाजार समितीच्या जवळपास ४० गाळ्यांना पुरवठा केली जाते. हा वीजचोरीचा प्रकार मागील सहा-सात वर्षांपासून बिनदिक्कत सुरु होता. या बदल्यात रॅकेट चालक गाळा धारकांकडून प्रत्येकी हजार रु पयाप्रमाणे महिन्याला ४० हजाराची वसुली करत होते. अशा प्रकारे मागील काही महिन्यात जवळपास २५ ते ३० लाखांची वीज चोरी झाली असावी. वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांकडे निनावी तक्रारी आल्यानंतर थेट गाळाधारकांनाच दोषी धरून त्यांना प्रत्येकी पाच ते सात हजाराचा दंड केला आहे. गाळाधारकांनी त्यांना कोणी वीज दिली याची माहिती सांगूनही अधिकाºयांनी मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे विद्युत खांबावर टाकलेला आकडा आजही कायम असून बिनदिक्कत वीजचोरी सुरूच आहे. यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीजचोरीचे रॅकेट चालविणाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस करतील का ? असा प्रश्न ग्राहकांतून विचारण्यात येत आहे. चोरीच्या मार्गाने वीज गाळेधारकांसह मोंढा भागातील अनेक पतसंस्था, बड्या व्यापाºयांना देण्यात आली. परंतु त्यांना दंडातून सूट देण्याचा प्रताप वितरणने केल्याचे उघड झाले आहे.

Web Title: The municipality, the market committee stole the grids and power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.