‘एमपीडीए, मोक्का’कारवाईत बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:56 PM2019-06-11T23:56:24+5:302019-06-11T23:56:45+5:30

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धुमाकूळ घालणाºया आर्या गँग, आठवले गँगसारख्या १० टोळ्यांवर मोका तर ३९ कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई करून बीड जिल्हा पोलीस दलाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

'MPDA, Mokka' second place in Beed District | ‘एमपीडीए, मोक्का’कारवाईत बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी

‘एमपीडीए, मोक्का’कारवाईत बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी

Next
ठळक मुद्देयशस्वी कामगिरी : अवैध धंद्यांतून साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त

बीड : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धुमाकूळ घालणाºया आर्या गँग, आठवले गँगसारख्या १० टोळ्यांवर मोका तर ३९ कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई करून बीड जिल्हा पोलीस दलाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच जुगार, दारू अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेत अडीच वर्षात तब्बल ६ कोटी ३१ लाख १५ हजार ३११ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी ही कामगिरी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यापासून गुन्हेगारांवर विविध मोठ्या कारवाया केल्या. चोरी, दरोडे, खूनासारखे गुन्हे करणाºया टोळ्यांविरोधात त्यांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली. यामध्ये कोल्हापूरची आर्या गँग, बीडची आठवले गँग, आष्टीची पवार व भोसले गँग, राजूरीची गँग आदींचा समावेश आहे. एकूण ५२ आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. तर ३९ अट्टल गुन्हेगारांवरही एमपीडीए कारवाई केल्या. यातील ३५ आरोपींना स्थानबद्ध करून त्यांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.
कायदेशीर कारवायांसह सामाजिक उपक्रमही बीड पोलिसांनी हाती घेतले. सामाजिक सलोख्यासाठी मॅरेथॉन, क्रिकेट स्पर्धा, रोजगार मेळावा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा व सवलत तसेच इंग्लिश स्कूल आदी कार्यक्रम हाती घेतले. मराठा आरक्षण, भिमा कोरेगाव, लोकसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूकाही निर्विघ्नपणे पार पाडण्यात पोलिसांना यश आले आहे. आर्मी सेल, एम्प्लॉयमेंट सेलचीही स्थापना अधीक्षक कार्यालयात करण्यात आली आहे. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्यासह सध्याचे अपर अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने चांगली कामगिरी केली आहे.
७४ गुंड जिल्ह्यातून हद्दपार
जिल्ह्यात दहशत माजविणारे ७४ गुंड जिल्ह्यातून एक व दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. अद्यापही काही प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.
गुन्हे उघड करण्यातही बीड अव्वल
बीड पोलिसांचे गुन्हे उघड करण्याचे प्रमाण ८३.७२ टक्के असून राज्यात चौथा क्रमांक आहे. जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात तिसरा, दिवसा घरफोडी चौथा, रात्रीची घरफोडी अव्वल आहे तर खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, वियभंग, दरोड्याचे गुन्हे उघड करण्याचे प्रमाण १०० टक्के आहे. वाहन चोरीचे प्रमाण ३६ ने घटले आहे.

Web Title: 'MPDA, Mokka' second place in Beed District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.