मोदी फॅक्टर, विकासाचा महामार्ग, रेल्वेकामाची प्रगती, जयदत्त क्षीरसागर यांचे शिवबंधन भाजपच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:45 AM2019-05-24T01:45:25+5:302019-05-24T01:45:50+5:30

मागील बीड लोकसभा पोटनिवडणुकीत बीड विधानसभा मतदार संघातून मिळालेली सहानुभूतीपूर्वक साथ यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट नसतानाही दिसून आली.

Modi factor, highway for development, progress of railway, Jaydatta Kshirsagar's Shivbandh on BJP's path | मोदी फॅक्टर, विकासाचा महामार्ग, रेल्वेकामाची प्रगती, जयदत्त क्षीरसागर यांचे शिवबंधन भाजपच्या पथ्यावर

मोदी फॅक्टर, विकासाचा महामार्ग, रेल्वेकामाची प्रगती, जयदत्त क्षीरसागर यांचे शिवबंधन भाजपच्या पथ्यावर

Next
ठळक मुद्देबीड : युतीमधील एका घटक पक्षाच्या विरोधामुळे होणारी तूट भरून काढण्यात भाजपा यशस्वी ठरली

बीड : मागील बीड लोकसभा पोटनिवडणुकीत बीड विधानसभा मतदार संघातून मिळालेली सहानुभूतीपूर्वक साथ यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट नसतानाही दिसून आली. जातीवादाला थारा न देता मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या बाजूने कौल दिल्याचे दिला. बीड विधानसभा मतदार संघातून ६ हजार २६२ मतांची आघाडी भाजपने घेतली. राष्टÑीय स्तरावरील मुद्यांबरोबरच स्थानिक पातळीवर बदलेली राजकीय समीकरणे आणि केडरबेस कार्यकर्त्यांकडून झालेले क्षेत्र रक्षण भाजपच्या विजयासाठी महत्वाचे ठरले.
बीड विधानसभा मतदार संघाचे आ.जयदत्त क्षीरसागर यांना राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षात झालेल्या कोंडीमुळे वर्षभरापासून क्षीरसागरांची भाजपशी जवळीकता वाढली. नगर पालिकेच्या माध्यमातून कार्यक्रमांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीडमध्ये बोलावून क्षीरसागर यांनी राष्टÑवादीला जयमहाराष्टÑ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे क्षीरसागर यांची यंत्रणा प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापनात कामी आल्याने मतदार संघातून भाजपला आघाडी मिळाली.
जातीय समिकरणांची गोळाबेरीज करताना शिवसंग्रामचे राजेंद्र मस्केंनाही भाजपने आपलेसे केले. त्यानंतर जि. प. सदस्य अशोक लोढा भाजपकडे वळले. त्यामुळे निवडणुकीच्या काही महिने आधीपासून युतीमधील घटकपक्ष शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी घेतलेला पवित्रा फारसा प्रभावी ठरला नाही. मित्रपक्ष शिवसेनेचीही भाजपला चांगली साथ मिळाली. भाजपसोबत शिवसेना व इतर घटक पक्ष राहिल्याने तसेच मतदारांनी विकासाला प्राधान्य दिल्यामुळे जातीवादाचा मुद्दा निष्प्रभ ठरला. बीड शहरातील ओबीसी समूह तसेच परंपरागत मानणारा मतदार एकसंध राहिल्याने भाजपला कव्हरींग झाले. दुसरीकडे जि. प. सदस्य व राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे विशिष्ट मुद्याभोवती केंद्रीत राहिल्याने त्याचा विपरित फटका बसला. संदीप क्षीरसागर गटाकडून मोठे पाठबळ मिळाल्याने निवडणूक प्रचार यंत्रणा शाबित ठेवता आली. नवखा उमेदवार असतानाही सोनवणे यांनी मात्र चांगली लढत दिली.

Web Title: Modi factor, highway for development, progress of railway, Jaydatta Kshirsagar's Shivbandh on BJP's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.