लघुशंकेला थांबले अन् १० लाखांचा गुटखा गमावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:35 AM2018-09-19T00:35:52+5:302018-09-19T00:36:29+5:30

लघुशंका करण्यासाठी गुटख्याने भरलेला टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा केला. एवढ्यात पिंपळनेर पोलीस आले आणि झडती घेतली. यामध्ये तब्बल १० लाख रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी टेम्पोसह चालक, क्लिनरला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील भाटसांगवी परिसरात केली.

Minority stopped and lost the gutka of 10 lakh! | लघुशंकेला थांबले अन् १० लाखांचा गुटखा गमावला!

लघुशंकेला थांबले अन् १० लाखांचा गुटखा गमावला!

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळनेर पोलिसांची कारवाई : टेम्पोसह चालक, क्लिनर घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लघुशंका करण्यासाठी गुटख्याने भरलेला टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा केला. एवढ्यात पिंपळनेर पोलीस आले आणि झडती घेतली. यामध्ये तब्बल १० लाख रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी टेम्पोसह चालक, क्लिनरला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील भाटसांगवी परिसरात केली.
पिंपळनेर पोलीस ठाण्याकडून रात्र गस्त सुरू होती. याचवेळी त्यांना भाटसांगवी जवळ एक टेम्पो (एम.एच. ४६ ए.आर. २९२६) संशयास्पदरित्या उभा दिसला. त्यांनी विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणी केली असता टेम्पोत गुटखा असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ संतोष गणपती रेड्डी (३० बडी भोंडगाव ता.निलंगा), शेषराजू कुट्टेगवडा (२७ रा.बेंगलोर) यांना ताब्यात घेतले. टेम्पो पोलीस ठाण्यात आणण्यात आला. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई केली जात असल्याचे सपोनी उबाळे यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बी.डी.झिंजुर्डे, गायकवाड, येवले यांनी केली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.
उमरग्यातून चालक बदलला
गुटखा माफियांची साखळी आहे. बेंगलोरहून गुटखा आल्याचे सांगण्यात आले. उमरगा येथून टेम्पो चालक बदलण्यात आले होते. यानंतर जालना येथे चालक बदलला जाणार होता. केवळ मोबाईलवरून हा सर्व प्रकार चालत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या साखळीचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे.

Web Title: Minority stopped and lost the gutka of 10 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.