बीडमध्ये दूध संघांचे संकलन ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:30 AM2018-07-18T00:30:55+5:302018-07-18T00:31:14+5:30

Milk teams have been compiled in Beed | बीडमध्ये दूध संघांचे संकलन ठप्पच

बीडमध्ये दूध संघांचे संकलन ठप्पच

Next
ठळक मुद्दे१८ हजार ९५० लिटर दूध आले

बीड : मंगळवारी बीड जिल्ह्यात अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण १८ हजार ९५० लिटर दूधाचेच संकलन झाले. सहकारी दूद संघाचे संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्प होते. जिल्ह्यात शासनामार्फत केवळ अंबाजोगाई येथील दूध शीतकरण केंद्रात संकलन केले जाते. या केंद्रात अंबाजोगाई आणि परळी तालुका संघामार्फत दूध संकलन होते. सोमवारी १६ हजार ५०० तर मंगळवारी १६ हजार २०० लिटर दूध संकलन झाले. संकलित दूध हे भूम आणि उदगीर येथे दुसºया दिवशीही पोलीस बंदोबस्तात पाठविले.

मंगळवारी बीड जिल्हा सहकारी दूध संघात संकलन झाले नाही. बीड तालुका दूध संघात १ हजार ५१ लिटर तर आष्टी तालुका सहकारी दूध संघात ११५० लिटर संकलन झाले. गेवराई तालुका संघाकडेही दूध संकलन झाले नाही. तर खाजगी दूध डेअरींचे जवळपास ५० हजार लिटर अपेक्षित असताना केवळ ५५० लिटर संकलन झाले. जिल्ह्यात शासकीय, सहकारी दूध संघ तसेच खाजगी डेअरींचे मिळून जवळपास २ लाख लिटर दूध संकलन होते. आंदोलनामुळे सहकारी संघ व खाजगी दूध संकलन ठप्प झाले. तर शासकीय दूध संकलन सुरळीत झाले.

कडा, आष्टीत दूध ओतले
आष्टी/ कडा : मंगळवारी दुस-या दिवशीही आष्टी तालुक्यातील शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. दुधाला तीस रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी सुभाष कर्डिले, बाळासाहेब कर्डिले, मधुकर सांगळे, गंगाधर सांगळे, रोहिदास सांगळे, उद्धव कर्डिले, शिवाजी कर्डिले, विठ्ठल कर्डिले, अशोक कर्डिले, अविनाश कर्डिले, रामभाऊ कर्डिले,अप्पा सांगळे, नागेश कर्डिले, गोरख कर्डिले, रझाकभाई सय्यद, राम कर्डिले, बंडू शिंदे, काशीनाथ कर्डिले, रफिक सय्यद, विष्णू कर्डिले, शंकर सांगळे, भागचंद सांगळे, राजू पवळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे खाजगी दूध संकलन केंद्रावर एका वारक-याला दुग्ध स्नान घालण्यात आले. तर एका शेतकºयाने म्हशीला दुधाची आंघोळ घातली.

Web Title: Milk teams have been compiled in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.