वॉटरकप स्पर्धेतील कामाने मस्साजोग झाले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:46 PM2019-05-11T14:46:30+5:302019-05-11T14:56:06+5:30

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस ऐन दुष्काळात पंधरा फुटांवर पाणी  

massajog water scarity reduces due to Watercup title | वॉटरकप स्पर्धेतील कामाने मस्साजोग झाले पाणीदार

वॉटरकप स्पर्धेतील कामाने मस्साजोग झाले पाणीदार

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंच अश्विनी संतोष देशमुख यांनी गतवर्षी वॉटरकप स्पर्धेत गावाची नोंद केली.श्रमदानासाठी गावातील २७० महिला दररोज श्रमदानात सहभागी होत असत.

- दीपक नाईकवाडे

केज (जि. बडी) : गतवर्षी वॉटरकप स्पर्धेत गाव शिवाराच्या चोहोबाजूने माथा ते पायथ्यापर्यंत ग्रामस्थांनी श्रमदानासह यंत्रकामातून केलेल्या कामामुळे केज तालुक्यातील मस्साजोग हे गाव पाणीदार झाले आहे. दुष्काळी परिस्थितीतही मस्साजोगला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसिंचनच्या विहिरीस पंधरा फुटांवर पाणी उपलब्ध आहे. 

सरपंच अश्विनी संतोष देशमुख यांनी गतवर्षी वॉटरकप स्पर्धेत गावाची नोंद केली. गावात काय कामे करावयाची आहेत, याचे शास्त्रशुद्ध पध्दतीचे प्रशिक्षण गावातील धनंजय देशमुख, अमोल बनसोड, किरण सोनवणे या तिघांनी घेतले. नंतर वॉटरकप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कालावधीत काय कामे करायची याचेही नियोजन केले. 

वॉटरकप स्पर्धेच्या कामासाठी श्रमदानात गावातील महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला. श्रमदानासाठी गावातील २७० महिला दररोज श्रमदानात सहभागी होत असत. यात दीडशे पुरु षांसह मुलांनीही श्रमदान केले. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला. मात्र वाहून जाणारे पाणी वॉटरकपच्या कामामुळे गावाच्या शिवारातच मुरले. परिणामी या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळातही गावातील हनुमान मंदिराजवळच्या हातपंपास एकदा हापसल्यावर एक लिटर पाणी येते, तर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसिंचनच्या विहिरीस अवघ्या पंधरा फुटांवर पाणी आहे. तलावातील विहिरीसही पंधरा फुटांवर पाणी आहे. ही सर्व किमया मस्साजोग ग्रामस्थांनी वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदानातून केलेल्या कामामुळे झाली आहे.  

नेमके काय केले?
मस्साजोग गावच्या १५४५ हेक्टर शिवारात गावच्या चोहोबाजूने माथा ते पायथ्यापर्यंत श्रमदानातून ८ हजार १०० घनमीटर काम केले. यामध्ये कंपार्टमेट बंडीग, मातीनाला बांध, एलबीएफ (लुज बोल्डर स्टक्चर) आदी कामे केली गेली.यंत्राद्वारे  नाला खोलीकरण व रु ंदीकरण, छोटे ओढे खोलीकरण व रुंदीकरण,  नदी खोलीकरण व रूंदीकरण यासह गावाजवळील धनगर वस्तीवरील पाझर तलावातील गाळ काढून यंत्राद्वारे १ लाख २८ हजार १८३ घनमीटरचे काम करण्यात आले. या सोबतच सात शेततळे खोदण्यात आली. यामधील पाच शेततळे हे इनलेट आउटलेटचे तर दोन इनलेट आउटलेट विरहित कपड्याचे करण्यात आले. 

Web Title: massajog water scarity reduces due to Watercup title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.