माजलगाव-पुणे ट्रॅव्हल्स पलटी होऊन एक ठार, आठ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 01:13 AM2017-11-21T01:13:30+5:302017-11-21T01:13:44+5:30

बीड : माजलगाववरून पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स पलटी होऊन एक ठार, तर आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात वडवणीजवळ सोमवारी मध्यरात्री ११.४५ वाजता झाला. शेषराव कुलकर्णी (रा. पुणे), असे मृताचे नाव आहे.

Majolgaon-Pune Travels turned upside down and killed one, eight seriously | माजलगाव-पुणे ट्रॅव्हल्स पलटी होऊन एक ठार, आठ गंभीर

माजलगाव-पुणे ट्रॅव्हल्स पलटी होऊन एक ठार, आठ गंभीर

googlenewsNext

बीड : माजलगाववरून पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स पलटी होऊन एक ठार, तर आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात वडवणीजवळ सोमवारी मध्यरात्री ११.४५ वाजता झाला. शेषराव कुलकर्णी (रा. पुणे), असे मृताचे नाव आहे.
माजलगाववरून ही ट्रॅव्हल्स रात्री ११ वाजता निघाली होती. वडवणीजवळ समोरील वाहनाला चकविताना ही ट्रॅव्हल्स पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. या अपघातात एक ठार, तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. इतर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींवर वडवणी आणि तेलगाव प्राथमिक केंद्रांत उपचार केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघातात गणेश धर्मराज कदम (रा. निपाणी टाकळी), माऊली रामकिशन शिंदे (रा. पायतळवाडी), ज्ञानेश्वर कारभारी नरवटे, वैभव दगडू पांढरे (रा. पायतळवाडी), अविनाश कांबळे, सुभाष डाके, दत्ता लक्ष्मण जवदले (हिंगणवाडी), अजित बाबासाहेब सोनपसारे हे किरकोळ जखमी झाले असून इतरांची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: Majolgaon-Pune Travels turned upside down and killed one, eight seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.