बेसबॉलच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:53 PM2018-11-10T18:53:40+5:302018-11-10T18:54:51+5:30

इंदापुर येथे होत असलेल्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड नुकतीच बीडमध्ये करण्यात आली आहे.

The Maharashtra team for the Baseball national school tournament was announced | बेसबॉलच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

बेसबॉलच्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

Next

बीड : इंदापुर येथे होत असलेल्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड नुकतीच बीडमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १७ वर्षांखालील मुला, मुलींचा समावेश आहे.

बीडमध्ये नुकत्याच राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मुले व मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने बाजी मारत आपला दबदबा निर्माण केला होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-यांना राज्याच्या संघात संधी देण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, असो.चे कोषाध्यक्ष अशोक सरोदे, अजय पवार, संतोष वाबळे, ज्ञानेश काळे, विशाल खंडारे, इंद्रजीत नितनवार, राजेंद्र बनसोडे, अविनाश बारगजे आदींची यावेळी उपस्थिती होती.

मुलांचा संघ :
सौरभ गायकवाड (सातारा), गणेश गवळी (जळगाव), प्रीतम शिंदे (पुणे), चैतन्य कट्टे (सातारा), अभिषेक थोरात (पुणे), विजय खोडसे (ठाणे), भागवत पाटील (जळगाव), गजानन पिंगळे (जालना), विपुल विळे (उस्मानाबाद), पद्मज बोगावार (यवतमाळ), अक्षय उगमोले (सातारा), कल्पेश राजपूर (ठाणे), अखीलेश ठाकरे (हिंगोली), धैर्यशील चोरमले (सांगली), अमर तायतकर (अमरावती), कैफ शेख (बीड)

मुलींचा संघ :
सुजाता थोरवडे (सातारा), साक्षी गांडगे (सातारा), दुर्गा काकडे (लातूर), अनघा यादव (पुणे), नेहा राजपूत (जळगाव), पुजा उगले (परभणी), स्नेहल करांडे (सातारा), इश्वरी शिंदे (औरंगाबाद), रिया डोंगरे (अकोला), साधना पवार (लातूर), मानसी पाटील (कोल्हापूर), वेदांगी सुरदुसे (नागपूर), भूमिका घोरपडे (जळगाव), अलका चौरे (बीड), चेतना मंगरूळे (सोलापूर), श्रृष्टी वेत्तीवार (हिंगोली)

Web Title: The Maharashtra team for the Baseball national school tournament was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.