land record staff arrested in Majalgaon; Beed ACB took Action | माजलगावमध्ये भुमापक कर्मचारी लाच घेताना अटक; बीड एसीबीची कारवाई  
माजलगावमध्ये भुमापक कर्मचारी लाच घेताना अटक; बीड एसीबीची कारवाई  

माजलगाव (जि.बीड) : जमिनीचे क्षेत्र निश्चीत करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना माजलगाव येथील भुमिअभिलेख कार्यालयातील भुमापक एस.जी.राठोड यांना एक हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी चार वाजता भुमिअभिलेख कार्यालयाच्या आवारात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली. 

विशेष म्हणजे आज सकाळी तक्रार येताच बीडच्या एसीबीने तात्काळ सापळा लावला. दुपारी चार वाजता तर राठोड हे लाच स्विकारताना एसबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गजानन जाधव, राकेश ठाकूर, मनोज गदळे, भारत गारदे, नदीम सय्यद आदींनी केली.


Web Title: land record staff arrested in Majalgaon; Beed ACB took Action
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.