जालना पंचायत समिती राज्यात मॉडेल ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:29 AM2018-10-05T00:29:56+5:302018-10-05T00:31:08+5:30

शहरात सुसज्ज अशी पंचायत समितीची इमारत उभी राहणार असून, ही इमारात राज्यातील इतर तालुक्यांसाठी मॉडेल ठरेल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे व्यक्त केला. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे गुरुवारी भुसे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

The Jalna Panchayat Samiti will be the model in the state | जालना पंचायत समिती राज्यात मॉडेल ठरेल

जालना पंचायत समिती राज्यात मॉडेल ठरेल

Next
ठळक मुद्देदादाजी भुसे : पाच कोटी रूपये खर्च करून उभारणार अद्ययावत इमारत, संगणकीकरण आणि दस्तऐवजांचे डिजिटिलायजेशन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात सुसज्ज अशी पंचायत समितीची इमारत उभी राहणार असून, ही इमारात राज्यातील इतर तालुक्यांसाठी मॉडेल ठरेल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे व्यक्त केला. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालनापंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे गुरुवारी भुसे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, जि. प. माजी अध्यक्ष पंडित भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि अर्जुन खोतकर नेहमी प्रयत्नरत असतो. आज ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात नसणारी पंचायत समितीची इमारत जालन्यात होत आहे. त्यामुळे याचा नक्कीच विकासासाठी फायदा होणार आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रंधानमंत्री आवास योजना सुरु केली. सध्या गावा - गावात सर्वे करण्यात येत आहे. परंतु, काही नागरिकांना जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अपूर्णच राहात होते. यासाठी सरकारने २०११ अगोदरच्या ज्या नागरिकांनी गायरान जमीनींवर कब्जा केला. त्यांना त्या जमीनी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांची नोंदणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
या नोंदणी दरम्यान एखाद्या ग्रामसेवकांने नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारही भुसे यांनी दिला. महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने बॅकांना कर्ज तसेच महिलांचे खाते उघडण्यासाठी बॅकांनी एक दिवस राखून ठेवण्याचे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती सुमन घुगे, रघूनाथ तौर, पांडूरंग डोंगरे, दत्ता बनसोडे, ए. जे. बोराडे, पं.स. सदस्य संतोष मोहिते, जनार्दन चौधरी, सुनिल कांबळे, कैलास उभाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, गटविकास अधिकारी मिना रवताळे, कार्यकारी अभियंता के. बी. मराठे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्याची उपस्थिती होती.
अर्जुन खोतकर : दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
यावर्षी पाऊस न पडल्याने बिकट अवस्था झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पशुसंर्वधन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकटीकरणामध्ये मोठा सहभाग असलेल्या बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी गटातील महिलांना अधिकाधिक बँककर्ज उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The Jalna Panchayat Samiti will be the model in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.