राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:00 AM2019-07-21T00:00:19+5:302019-07-21T00:02:17+5:30

आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी २३ ते २५ जुलै अशा तीन दिवस मुलाखती होणार आहेत. समुपदेशन करून त्यांना पदस्थापना जागीच दिली जाणार आहे.

Interviews for 877 seats of medical officers in the state | राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’चा पाठपुरावा । ११५० उमेदवारांची यादी

बीड : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी २३ ते २५ जुलै अशा तीन दिवस मुलाखती होणार आहेत. समुपदेशन करून त्यांना पदस्थापना जागीच दिली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त अनुपकुमार यादव यांनी हे आदेश काढले आहेत. यासाठी ११५० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.
राज्यात वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त जागांचा प्रश्न ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला होता. त्यानंतर रखडलेल्या पदभारतीबाबत गुणवत्ता यादी तात्काळ जाहीर केली. आता शुक्रवारी उशिरा आरोग्य सेवा आयुक्त अनुपकुमार यादव यांनी ८७७ जागांसाठी २३ ते २५ जुलैदरम्यान समुपदेशन व मुलाखती घेण्यासाठी वेळ निश्चित केला आहे.
८७७ जागांसाठी ११५० उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. यासाठी दोन याद्या तयार केल्या असून पहिल्या यादीत ७४९ उमेदवार आणि दुसºया यादीत ४०१ उमेदवारांचा समावेश आहे. ही भरती होत आजारी आरोग्य सेवा सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये समाधान आहे. या मुलाखती मुंबईच्या आरोग्य भवनात सकाळी ९ वाजेपासून सुरू होणार आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाने २९९१ उमेदवारांची गुणवत यादी जाहीर केलेली आहे. ११५० पैकी काही उमेदवार गैरहजर राहिल्यास आणि ८७७ जागा रिक्त राहिल्यास पुन्हा एक यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नातेवाईकही राहू शकतात उपस्थित
यादीतील एखाद्या उमेदवारास काही अडचणीमुळे मुलाखतीस उपस्थित राहता आले नाही तर आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी या पैकी कोणालाही उपस्थित राहता येणार आहे. यासाठी उमेदवार व प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे शासन मान्य ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तसेच एकदा अनुपस्थित राहिल्यास पुन्हा मुलाखतीची संधी देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्त उमेदवाराला जागेवरच पदस्थापना पत्र दिले जाणार आहे.

इतर पदेही लवकर भरावीत
अपुºया मनुष्यबळामुळे कामात अनंत अडचणी येत होत्या. ८७७ जागा भरल्या जात असल्याने कामाचा ताण हलका होईल. एमओंना पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना दिल्यास अडचणी कमी होतील. इतर पदेही लवकर भरावीत.
-डॉ. आर. बी. पवार,अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटना, महाराष्ट्र

Web Title: Interviews for 877 seats of medical officers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.