सूक्ष्म निरीक्षकांची महत्त्वाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:26 AM2019-04-03T00:26:52+5:302019-04-03T00:27:46+5:30

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी मध्ये होणारी मतदान प्रक्रिया तटस्थपणे पाहणारे व त्याचे निरीक्षण करण्यासाठी निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो आॅर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे डोळे व कान असून या प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपादन बीड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अशोक एम.शर्मा यांनी आज केले.

Important role of micro observers | सूक्ष्म निरीक्षकांची महत्त्वाची भूमिका

सूक्ष्म निरीक्षकांची महत्त्वाची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक निरीक्षक अशोक शर्मा : सूक्ष्म निरीक्षक हे निवडणूक प्रक्रियेतील कान व डोळे

बीड : सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी मध्ये होणारी मतदान प्रक्रिया तटस्थपणे पाहणारे व त्याचे निरीक्षण करण्यासाठी निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो आॅर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे डोळे व कान असून या प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपादन बीड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अशोक एम.शर्मा यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये सुक्ष्म निरीक्षकांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना निरीक्षक शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण धरमकर आणि जिल्हा भरातून आलेले निवडणूक सुक्ष्म निरीक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी शर्मा म्हणाले, मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करताना त्यावेळी घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करुन त्याच्या माहितीचा अहवाल आपल्यामार्फत आयोगाकडे जातो. मतदानाच्या वेळी घडणाऱ्या अनुचित घटना, तक्रारीचे प्रसंग अथवा कोणत्याही बेकायदा बाबींवर कार्यवाई करण्यापूर्वी आयोग सुक्ष्म निरीक्षकाकडून आलेल्या अहवालाची दखल घेतो. हे संवदेनशील काम असून मतदानाच्या प्रक्रियेची पूर्ण माहिती आयोगाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला असली पाहिजे.
मुख्यत: ज्या मतदान केंद्रावर संवदेनशील अथवा तणावग्रस्त वातावरण आहे तेथे आपली नेमणूक होते आणि भविष्यात याअनुशंगाने जर पूर्नमतदान घेण्याचा निर्णय घेण्यासाठी आपली माहिती महत्वाची ठरते. देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये एक चांगली भूमिका निभवण्याची संधी आपल्याला मिळते आहे. असे निवडणूक निरीक्षक म्हणाले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले नि:पक्ष आणि मोकळया वातावरणात होणाºया निवडणूकीचे सुक्ष्म निरीक्षक हे मूक साक्षीदार आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नसून ते निवडणूक निरीक्षक आणि आयोगास उत्तरदायी आहेत. त्यांच्या भूमिकेमूळे मतदान प्रक्रियेच्या वेळी वातारणास एक गांभिर्य प्राप्त होते.
मतदार संघाचे निरिक्षक ही एक व्यक्ती म्हणून सर्व ठिकाणी पोहचू शकत नाही अशा वेळी मतदार केंद्रामध्ये असणारे सुक्ष्म निरीक्षक त्यांच्या व आयोगाच्या उपस्थितीची जाणीव मतदार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना करुन देत असतात. त्यांना या निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन आणि मतदानाच्यापूर्वी निवडणूक निरीक्षकांच्या सूचनेने प्रशासन करीत असलेल्या पथकांच्या कार्यवाईची माहिती देखील पाहू शकतात असे सांगितले.
यावेळी सूक्ष्म निरीक्षकपदाची जबाबदारी दिलेले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Important role of micro observers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.