बीड जिल्ह्यात छावण्या उघडा किंवा चाऱ्यासाठी मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:08 AM2018-10-21T00:08:43+5:302018-10-21T00:09:13+5:30

सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चा-यासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली.

Help for opening or filling camps in Beed district | बीड जिल्ह्यात छावण्या उघडा किंवा चाऱ्यासाठी मदत द्या

बीड जिल्ह्यात छावण्या उघडा किंवा चाऱ्यासाठी मदत द्या

Next
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागरांची मागणी : बांधावर जाऊन दुष्काळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चाºयासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली. ते बहीरवाडी, पिंपळनेर, नाळवंडी सर्कलच्या दौ-यावर होते.
यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, दिनकर कदम, अरूण डाके, दिलीप गोरे, विलास बडगे, गणपत डोईफोडे, अ‍ॅड.राजेंद्र राऊत, नगरसेवक विनोद मुळूक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या दौºयात त्यांच्या समवेत अरुण बोंगाणे, देवीलाल चरखा, गोरख दंने, जयदत्त थोटे यांच्यासह बहीरवाडी, पिंपळनेर, नाळवंडी सर्कलमधील कार्यकर्ते, शेतकºयांची उपस्थिती होती.
दुष्काळाचे चटके : ग्रामीण भागात जास्त
४आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, लोकांमध्ये उत्साह नाही, सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी ९ महिने जायचे आहेत. आणखी परिस्थिती गंभीर होणार आहे. कुठेही जा गुडघ्याच्यावर पिके दिसत नाहीत. जनावरांना चारा, पाणी नाही, बैलजोडी, म्हशी, दुभती जनावरे दावणीला बांधून ठेवता येणार नाहीत.
४सरकारने आता तातडीने मदत करण्याची गरज आहे. आता खºया आधाराची गरज आहे, तलाव आटले आहेत, धरणे कोरडी पडू लागली आहेत. त्यात १ ते २ महिने भागेल एवढेच पाणी आहे. पुढे काय ? काही दिवसांपूर्वीच सर्व अधिकारी व पत्रकारांना बरोबर घेऊन माजलगाव धरणावर जाऊन पहाणी केली. शहराला दररोज २ कोटी लिटर पाणी लागते. भविष्यात ४ कोटी लिटर पाणी लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासूनच करता यावे, यासाठी अमृत अटल योजना महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी केंद्रीय स्तरावर आपण पाठपुरावा करून ही योजना प्राधान्याने मंजूर करून घेतली.
४उमरद खालसा हे बीड जवळचे गाव आहे. अनेकजण शहरात राहतात परंतु, ग्रामीण भागात दुष्काळ अधिक तीव्र जाणवतोय. बीड ते सुर्डी माजलगाव या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्ताव दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Help for opening or filling camps in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.