तालखेडच्या महिलांचे पं.स.समोर हंडा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:07 AM2019-03-29T00:07:52+5:302019-03-29T00:08:23+5:30

माजलगाव : तालुक्यातील तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सहा तांड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे गुरूवारी अखिल भारतीय ...

Handa movement in front of Panchsheel women | तालखेडच्या महिलांचे पं.स.समोर हंडा आंदोलन

तालखेडच्या महिलांचे पं.स.समोर हंडा आंदोलन

Next

माजलगाव : तालुक्यातील तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सहा तांड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे गुरूवारी अखिल भारतीय किसन सभेच्या वतीने महिलांनी पंचायत समिती कार्यालयासमोर महिलांसह हंडे घेऊन टँकरच्या मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यात बहुतांश भागात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अद्यापपर्यंत १२ टँकरव्दारे काही भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतू म्हणावी त्या प्रमाणात टँकरची मागणी असताना, प्रशासनाकडून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यात उदासिन दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत जामगातांडा, झिंझुर्र्डी तांडा, येळातांडा, हनुमान नगर, कुरण तांडा, रेणुकाई तांडा या सहावर तांड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे मागणी करून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे गुरूवारी अ.भा. किसान सभेचे वतीने मोहन जाधव, विनायक चव्हाण, अशोक राठोड, विजय राठोड, संजय चव्हाण, भीमराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर हंडे घेवून महिलांसह उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Handa movement in front of Panchsheel women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.