बीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 1:17am

यावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : यावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.

बीड येथील भाजीमंडईत भाज्यांची चांगली आवक होत आहे. शहरालगतच्या व तालुक्यातील शेतकºयांनी खरीप व नंतर रबी पिकांसह भाजी शेतीवरही भर दिला. त्यामुळे रोज ताज्या भाज्या घेऊन शेतकरी येत आहेत. मेथी, कोथिंबीर, पुदीना एक रुपयाला तर पालक, शेपू, चुका जुडी दोन रुपयांना विकली जात आहे. भेंडीचे दर स्थिर असून ३० ते ४० रुपये किलो भाव आहे. वाल शेंग २० ते २५ रुपये तर कारले ४० ते ६० रुपये किलो विकले जात आहे. लिंबुचे दर १२ रुपये किलो आहे. टोमॅटोचे भावही कमालीचे घसरलेले आहेत. हलक्या प्रतीचे टोमॅटो ५ तर चांगल्या प्रतीचे टोमॅटो १० रुपये किलो आहेत. कांदा वधारला दोन दिवसांपुर्वी १५ ते २० रुपये किलो विकलेल्या कांद्याची मागणी वाढल्याने तेजी आली आहे. किरकोळ बाजारात २५ रुपये किलो भाव आहे. बटाट्याचे दर मात्र १० रुपये किलोप्रमाणे स्थिर आहेत.

फ्लॉवर १० रुपये किलो फ्लॉवर, पत्ता कोबी १० रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात आवकमुळे विक्रेत्यांवर सांभाळण्याची वेळ आली आहे. कोबीबरोबरच वांगीचे भावही कमालीचे कोसळले आहे. वांगी आणि गिलकेदेखील १० रुपये किलो आहेत.

संबंधित

वर्षभरात साडेबारा हजार वाहनधारकांवर कारवाई
सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या
उस्मानाबादच्या ‘सैराट’ जोडप्याला बीड पोलिसांनी पकडले
विधि विद्यापीठाने सोडली करोडीची ५० एकर जागा
शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर बीडमध्ये अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

बीड कडून आणखी

वर्षभरात साडेबारा हजार वाहनधारकांवर कारवाई
सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या
उस्मानाबादच्या ‘सैराट’ जोडप्याला बीड पोलिसांनी पकडले
विधि विद्यापीठाने सोडली करोडीची ५० एकर जागा
शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर बीडमध्ये अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

आणखी वाचा