प्रवाशांची बॅग लुटणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:12 AM2018-12-15T00:12:05+5:302018-12-15T00:12:29+5:30

प्रवाशांच्या बाजूला बसून हातचलाखी करीत बॅग व रोख रक्कम लंपास करणाºया महिला चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिरूर तालुक्यात केली.

The gang of traffickers looted the gang | प्रवाशांची बॅग लुटणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

प्रवाशांची बॅग लुटणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

Next
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : प्रवासी महिलेच्या बाजूला बसून महिलांची हातचलाखी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रवाशांच्या बाजूला बसून हातचलाखी करीत बॅग व रोख रक्कम लंपास करणाºया महिला चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिरूर तालुक्यात केली. पोलिसांचा सुगावा लागताच तिघींपैकी एक महिला पळ काढण्यात यशस्वी ठरली.
उमा शहादेव भोसले (२५, रा. रापूर, ता. शिरूर) व नाता भाऊसाहेब भोसले (२२, रा. झापेवाडी, ता. शिरूर) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहे.
साधारण दीड महिन्यांपूर्वी पिंपळनेरची एक महिला रिक्षातून गावाकडून जात होती. याचवेळी उमा व नाता रिक्षात बसल्या, तर फरार असलेली अन्य एक महिला समोर बसली. तिने फिर्यादी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले, तर इतर दोघींनी हातचलाखीने तिच्याजवळील दोन तोळे दागिने, मोबाईल व रोख तीन हजार रुपये घेऊन पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ही टोळी दिवसेंदिवस जिल्ह्यात सक्रिय होत असतानाच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल धस यांना त्यांची माहिती मिळाली. शुक्रवारी त्यांनी त्यांच्या वस्तीवर सापळा रचला. अचानक धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईलही जप्त केला आहे. अन्य एका महिलेला मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने ती पळून जाण्यात यशस्वी ठरली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, पो.नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, पो.ना. सखाराम पवार, नसीर शेख, बिक्कड व जयश्री नरवडे यांनी केली.
प्रवासात सावधतेची गरज
बस किंवा रिक्षा, जीपद्वारे प्रवास करताना महिला प्रवाशांनी सावध राहण्याची गरज आहे. शेजारी महिला प्रवासी समजुन दुर्लक्ष केले जाते. मात्र काही महिला या चोरीच्या उद्देशाने प्रवास करत असतात. प्रवासी महिलेचे लक्ष विचलित करुन दागिने, सामानावर डल्ला मारतात. चोरी करणाºया महिला मध्येच उतरतात, आणि प्रवासी महिलेला चोरी झाल्याचे थेट प्रवास संपल्यानंतरच लक्षात येते. त्यामुळे प्रवास करताना महिलांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे.

Web Title: The gang of traffickers looted the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.