दागिने लुटणारी महिलांची टोळी माजलगावात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:52 PM2019-02-04T23:52:29+5:302019-02-04T23:53:20+5:30

बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिनले लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई माजलगाव शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी माजलगाव बसस्थानकात केली.

Gang-rape woman gang rape in Majalgaon | दागिने लुटणारी महिलांची टोळी माजलगावात गजाआड

दागिने लुटणारी महिलांची टोळी माजलगावात गजाआड

Next
ठळक मुद्देबीड शहर पोलिसांची कामगिरी : हमाल बनून सावज शोधणाराही जेरबंद

बीड : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिनले लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई माजलगाव शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी माजलगाव बसस्थानकात केली. या टोळीत चार महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोयाबीन हरिभाऊ भोसले (१९ रा. सावरगाव), सुभाष सोमाजी उमाप (४५ रा. ब्रम्हगाव), धूपता परमेश्वर जाधव (५० रा.गांधीनगर, बीड), शोभा संजय भालेराव (४० रा.रमाई चौक, बीड), मंगल सतीश तुसाबर (४२ रा. बलभीमनगर, बीड) अशी पकडलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
सादोळा येथील माधुरी सोळंके या बीडला माहेरी जाण्यासाठी माजलगाव बसस्थानकात आल्या. बराचवेळ थांबूनही बस आली नाही. दुपारी ३ वाजता बस येताच तिच्यात बसण्यासाठी एकच गर्दी झाली. हीच संधी साधून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठल चोरट्यांनी लंपास केले. बसमध्ये बसल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोउपनि एस.एस.बिराजदार यांनी स्थानकात धाव घेत कॅमेरे तपासले. यावेळी त्यांना काही महिलांवर संशय आला. सायंकाळी ५ वाजता त्यांनी सोयाबीन आणि सुभाषला ताब्यात घेतले. पोलीस हिसका दाखविताच त्यांनी इतर साथीदारांची नावे सांगितले. त्यानंतर रविवारी रात्रीच माजलगाव पोलीस बीडमध्ये आले. त्यांनी आणखी ३ महिलांना ताब्यात घेतले. सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, पोनि सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि एस.एस.बिराजदार, सहायक फौजदार सुंदर पवार, पोना किशोर राऊत, श्रीमंत पवार, संजिवणी सोन्नर आदींनी केली.

सुभाष हा बसस्थानकातच हमाली करतो. महिलांच्या गळ्यातील दागिने, पोलीस आहेत का? या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन या महिला चोरट्यांना देतो.
त्यानंतर या महिला संधी साधून धक्काबुक्की आणि गर्दी करीत महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करतात. तर शोभा ही कुख्यात गुन्हेगार गझनीची
आई आहे.

Web Title: Gang-rape woman gang rape in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.