परळीत मोंढा मार्केटमधील दुकानांना भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:32 AM2018-08-20T07:32:28+5:302018-08-20T08:40:49+5:30

परळीत मोंढा मार्केटमधील मुख्य रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

fire breaks at shops in Parli | परळीत मोंढा मार्केटमधील दुकानांना भीषण आग

परळीत मोंढा मार्केटमधील दुकानांना भीषण आग

बीड : परळीत मोंढा मार्केटमधील मुख्य रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चार दुकानांना भीषण आग लागली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली.

शॉर्टसर्किटमुळे दुकानांना आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत चार दुकाने जळून खाक झाली असून लाखोंचं नुकसान झालं आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थऴी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: fire breaks at shops in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireBeedआगबीड