सोलापूरच्या कांदा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:51 PM2018-08-13T23:51:56+5:302018-08-13T23:55:10+5:30

An FIR has been registered against the trader of Solapur | सोलापूरच्या कांदा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

सोलापूरच्या कांदा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

Next

बीड : धारुर तालुक्यातील आरणवाडी येथील कांदा उत्पादक शेतकºयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापा-याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकरी उन्हाळ्यात कांद्याचे पीक घेतात. कांद्याची चव, चकाकी, गुणवत्ता असल्यामुळे विविध ठिकाणच्या बाजार समितीमधील व्यापारी येथे येतात. त्याप्रमाणे कांदे काढणीला आले असता हनीफ रुकमोद्दीन अतनूरकर (रा. एल २, गाळा नंबर ४९, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, सोलापूर) हा व्यापारी आरणवाडी येथे आला.

येथील शेतक-यांना मी सोलापूर बाजार समितीतील मोठा व्यापारी असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळवून देतो, तुम्ही मला जास्तीत जास्त कांदे द्या, असे म्हणून जवळपास सात शेतकºयांचे २५ ते ३० टन कांदे खरेदी केले होते. याचा मोबदला म्हणून व्यापाºयाने शेतकºयांना धनादेशाच्या स्वरूपात तीन लाखांच्या जवळपास रक्कम दिली होती.

मात्र, व्यापा-याने दिलेले धनादेश चार महिने उलटून गेले तरी वटलेच नाहीत. यामुळे शेतकरी सोलापूर येथे या व्यापा-याकडे पैशासाठी हेलपाटे मारत आहेत. मात्र, व्यापारी सतत शेतकºयांना मी मोठा व्यापारी असल्याचे सांगत धमकी देत होता.

धनादेश वटला नसल्याचे शेतक-यांनी सांगितले असता त्यांना दमदाटी करण्यात आली. तरीही शेतक-यांनी तगादा लावला. चार महिने वाट पाहून विकलेल्या कांद्याची रक्कम न मिळाल्याने शेतक-यांनी अखेर धारुर ठाण्यात धाव घेत व्यापारी हनीफ अतनूरकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापा-याविरोधात अनेक तक्ररी
अनेक ठिकाणी हनीफ याच्या विरोधात शेतकºयांच्या अशाच तक्रारी आहेत. अनेकाला त्याने फसवले असून इतर जिल्ह्यातही त्याच्या विरोधात यापूर्वी गुन्हे नोंद झाले असल्याची माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सोलापुरातही हनीफ वादग्रस्त
हनीफच्या वर्तणुकीमुळे सोलापूर बाजार समितीने काही वर्षापूर्वी त्याचा परवाना रद्द केला होता.
मात्र दुस-याच्या नावे हा व्यापारी बाजार समितीत खरेदी, विक्र ीचे व्यवहार करत असून शेतक-यांची फसवणूक करत आहे. बाजार समितीच्या सभापतींकडे याबाबत तक्र ार करु नही त्यांनी मात्र याची दखल घेतली नाही, असे शेतक-यांनी सांगितले.

Web Title: An FIR has been registered against the trader of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.