सिरसाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:26 AM2019-01-17T00:26:43+5:302019-01-17T00:28:21+5:30

परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे.

Fasting in front of Zilla Parishad of Sarsala Gram Panchayat Employees | सिरसाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

सिरसाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

googlenewsNext

बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कर्मचा-यांना वेतनापोटी दिलेले धनादेश बॅँकेत वठले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रारही करण्यात आली आहे. वेतनाची थकित रक्कम त्वरित देण्याची मागणी निवेदनात केली आहे. आयटक संलग्न महाराष्टÑ ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली १९ कर्मचारी उपोषणात सहभागी आहेत.

Web Title: Fasting in front of Zilla Parishad of Sarsala Gram Panchayat Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.