बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:17 AM2019-01-23T00:17:22+5:302019-01-23T00:17:58+5:30

धारूर तालुक्यातील धुनकवाड नं. २ येथील सर्हे नं. २०/१ येथील गेल्या तीस वर्षांपासून चालू असलेला रस्ता याच गावातील रानुबा दगडू काळे व सुभाष रानुबा काळे यांनी जेसीबीने संपूर्णपणे खोदून टाकल्याने रस्त्यावरून वाहने तर सोडाच; पण चालने ही मुश्किल झाले आहे. हा रस्ता खोदल्याने अनेक शेतक-यांचा ऊस वाळून त्याचे सरपण होत आहे. त्यामुळे कुटुंबासह शेतक-यांनी धारु र तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Fasting with farmers' families in Beed district | बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

Next
ठळक मुद्देतीस वर्षांपासूनचा रस्ता अडविला : प्रशासनाची दिरंगाई; रस्त्याअभावी उसाचे सरपण; मच्छीमारांची अडचण

धारूर : धारूर तालुक्यातील धुनकवाड नं. २ येथील सर्हे नं. २०/१ येथील गेल्या तीस वर्षांपासून चालू असलेला रस्ता याच गावातील रानुबा दगडू काळे व सुभाष रानुबा काळे यांनी जेसीबीने संपूर्णपणे खोदून टाकल्याने रस्त्यावरून वाहने तर सोडाच; पण चालने ही मुश्किल झाले आहे. हा रस्ता खोदल्याने अनेक शेतक-यांचा ऊस वाळून त्याचे सरपण होत आहे. त्यामुळे कुटुंबासह शेतक-यांनी धारु र तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात शेतक-यांनी १७ जानेवारी रोजी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात २२ जानेवारीपर्यंत रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. परंतु सहा दिवस झाले तरी ही तहसीलचा व पोलीस स्टेशनचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी आला नसल्याने व या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला नसल्याने २२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर हे शेतकरी आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसले आहेत.
या प्रश्नाकडे प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकºयांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. जो पर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नाही असा पवित्रा उपोषणकर्ते यांनी घेतला आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत तहसीलचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी आला नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे पाहण्याची प्रशासनाची उदासीनतेची भूमिका स्पष्टपणे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.

Web Title: Fasting with farmers' families in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.