किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता अंबाजोगाईत शांततेत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 04:00 PM2018-01-03T16:00:10+5:302018-01-03T16:19:30+5:30

 भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला अंबाजोगाईत प्रतिसाद मिळाला व शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पाडण्यात आला. 

Except for retail stones, ambassadors have quieted off | किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता अंबाजोगाईत शांततेत बंद

किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता अंबाजोगाईत शांततेत बंद

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) :  भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला अंबाजोगाईत प्रतिसाद मिळाला व शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पाडण्यात आला. 

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात सकाळी मोठी मोटार सायकल रॅली निघाली होती. तर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली. बुधवारी दुपारी अज्ञात युवकांनी योगेश्वरी नगरी परिसरातील एस.एन.एस. ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीत पतसंस्थेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच शहरातील बाजार पेठेत किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. मात्र, पोलिसांच्या गस्तीनंतर निर्माण झालेला तणाव निवळला. बंद च्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

बसस्थानकात शुकशुकाट 
बंदमुळे शहरातील बसस्थानकात शुकशुकाट पहावयास मिळाला. 

Web Title: Except for retail stones, ambassadors have quieted off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.