बीड जिल्ह्यामध्ये तापाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:21 AM2018-09-22T00:21:21+5:302018-09-22T00:22:41+5:30

वातावरणातील बदलामुळे सध्या जिल्ह्यात व्हायरल फीवर आणि डेंग्यूचा फैलाव होत आहे. तर दुसरीकडे स्वाईफ्ल्यूचे काही रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील काही दिवसांपासून साथरोगांची स्थिती लक्षात घेत सहा ठिकाणी तापेचा उद्रेक जाहीर करून तातडीने उपाय करण्यात आले.

Epidemic outbreaks in Beed district | बीड जिल्ह्यामध्ये तापाचा उद्रेक

बीड जिल्ह्यामध्ये तापाचा उद्रेक

Next
ठळक मुद्देडेंग्यूचे रुग्ण आढळले : आरोग्य यंत्रणा सतर्क; व्हायरल फिव्हरपासून बचाव करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वातावरणातील बदलामुळे सध्या जिल्ह्यात व्हायरल फीवर आणि डेंग्यूचा फैलाव होत आहे. तर दुसरीकडे स्वाईफ्ल्यूचे काही रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील काही दिवसांपासून साथरोगांची स्थिती लक्षात घेत सहा ठिकाणी तापेचा उद्रेक जाहीर करून तातडीने उपाय करण्यात आले.
यावर्षी जूनपासून पावसाची स्थिती समाधानकारक राहिलेली नाही. दिवसा वाढते तापमान, रात्री गारठा, पहाटे ढगाळ वातावरणामुळे मागील २० दिवसांपासून व्हायरल फीवरची लागण अनेकांना झाली. खाजगी आणि सरकारी रुग्णालयात अशा रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिनाभरापूर्वी पाऊस झाला होता. त्यानंतर दडी मारली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली. तसेच भविष्यातील उपाय म्हणून शहरी भागात पाणी पुरवठ्यात बदल केले आहेत.
त्यामुळे चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी गरज लक्षात घेत घरोघरी पाणी साठे केले जात आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्यात डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या एडीज डासांची उत्पत्ती वाढत आहे.
जून- जुलैमध्ये असणारी आरोग्यदायी स्थिती मागील दोन महिन्यात बदलत गेली. तापेच्या रुग्णांमध्ये वाढ होत गेली. यातील काही रुग्णांच्या रक्त तपासणीत डेंग्यूचे निदान झाल्याने आरोग्य विभागही कामाला लागला आहे.
‘लक्षणे दिसताच उपचार घ्या’
मागील महिन्यातील यात्रा, सप्ताह अशा गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणाच्या भागातून साथरोगांचा तसेच स्वाईन फ्ल्यूचा फैलाव झाल्याचे दिसून आले आहे. सध्या गणेशोत्सव पाहण्यासाठी तसेच व्यवसायाच्या निमित्त बीडसह विविध भागातून लोक पुणे, मुंबईकडे जात आहेत. त्यामुळे परतणाºयांनी विशेष काळजी घेणे आवश्यक बनले आहे. ताप, सर्दी, अंगदुखी आदी लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सहा ठिकाणी तापउद्रेक : रुग्णसंख्येत वाढ
आॅगस्टमध्ये बीड येथील चक्रधर नगर परिसरात डेंग्यूची ६ जणांना लागण झाली तर संशयित डेंग्यूने एकाचा मृत्यू झाला. मात्र या भागात घेण्यात आलेल्या पाच रक्त नमुन्यात डेंग्यू आढळला नाही.
शिरूर तालुक्यातील नांदेवली येथे १६ जणांना तापेची लागण झाली. घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी चार नमुने डेंग्यूचे आढळले.
धारूर तालुक्यातील कारी येथही पाचपेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूची लागण झाली.
ताप उदे्रक स्थिती म्हणून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. सद्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
सप्टेंबरमध्ये अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागात ७ जणांना डेंग्यूची लागण व एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडे आहे.
दरम्यान केज तालुक्यातील आवसगाव, धारूर तालुक्यातील गावंदरा, सोनीमोहा तापेचे रुग्ण वाढले आहेत. बीड, माजलगाव आणि पाटोदा शहरातही रुग्णसंख्या वाढत आहे.

Web Title: Epidemic outbreaks in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.