देशात आणि राज्यात आणीबाणीची परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:06 AM2018-01-19T00:06:59+5:302018-01-19T00:07:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : देशात व राज्यात आणीबाणी येते की काय अशी परिस्थिती झाली असल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री ...

Emergency situation in the country and in the state | देशात आणि राज्यात आणीबाणीची परिस्थिती

देशात आणि राज्यात आणीबाणीची परिस्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देअजित पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : देशात व राज्यात आणीबाणी येते की काय अशी परिस्थिती झाली असल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. गेवराई येथे आय.टि.आय मैदानावर झालेल्या सभेत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर ‘हल्लाबोल’ केला.

या सभेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित, चित्रा वाघ, आ. राजेश टोपे, नवाब मलीक, आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, माजी आ.राजेंद्र जगताप, माजी मंत्री प्रकाश सोळुंके, अजिंक्य पाटील, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, राकॉचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, जयसिंग सोळुंके आदी उपस्थित होते.

पुढे पवार म्हणाले, भाजप व शिवसेना सरकारच्या राज्यात जनता सुखी नसल्याचे सांगून त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, डिगांबर येवले, आप्पासाहेब गव्हाणे, कुमार ढाकणे, पाटीलबा मस्के, बप्पासाहेब मोटेसह तालुक्यातील शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेपूर्वी पाडळसिंगी ते गेवराईपर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

 

Web Title: Emergency situation in the country and in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.