तेलगाव रोड भागात २५ दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:46 PM2019-06-11T23:46:57+5:302019-06-11T23:47:33+5:30

मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.

Distinct from 25 days in Telgaon area | तेलगाव रोड भागात २५ दिवसांपासून निर्जळी

तेलगाव रोड भागात २५ दिवसांपासून निर्जळी

Next
ठळक मुद्दे‘पाणी दो’ आंदोलनाचा इशारा : महिला थेट कलेक्टर कचेरीत; सहयोगनगर, जिजामाता चौक परिसर सोडला वाऱ्यावर

बीड : मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग, भांडवले गल्ली, आमेर कॉलनी, मिल्लत नगर, पापनेश्वर मंदिर परिसर, तेलगाव रोड, निमरा कॉलनी, मिल्लत नगर, अरीश कॉलनी व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.
नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे ही टंचाई निर्माण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तेलगाव रोडवरील राष्टÑीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर पाणी दो आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिला आहे. येथील नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर मुख्यत: अवलंबून आहेत. ते पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करत आहेत. त्यांना नगरपालिकेकडून पाणी मिळणे आवश्यक आहे, मात्र पालिकेच्या यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खुर्शीद आलम यांच्यासह, इलियास सेवक, जलीलभाई, जाफरभाई, रफिकभाई, नसीरभाई, नविद भाई, सगीर भाई, इिम्तयाज भाई, चांद भाई, पप्पूभाई, मुजीब भाई, बिलाल भाई, सईद भाई, रवि भैय्या, महेश भैय्या आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मोहंमदिया कॉलनी व लगतच्या भागात तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूर शोधाशोध करावी लागत आहे. दिवसभर पाण्यासाठी ताटकळावे लागत असून, दैनंदिन कामकाजावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याने या प्रश्नावर मंगळवारी संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
पाणी उपलब्ध असताना अनियमितता मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरपालिका जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करीत नसल्याचा नागरिकांना आरोप आहे. जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देऊन नियोजनानुसार ११ दिवसांआड सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा मोहंमदिया कॉलनी, आरेफ कॉलनी, सय्यद अलीनगर, तसेच लगतच्या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Distinct from 25 days in Telgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.