धोंडे, धसांची प्रतिष्ठा आष्टीत लागली पणाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:40 AM2019-04-16T00:40:04+5:302019-04-16T00:41:03+5:30

सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आष्टी विधानसभा मतदार संघाने पोटनिवडणुकीसह चार बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाला आघाडीच ...

Dhondi | धोंडे, धसांची प्रतिष्ठा आष्टीत लागली पणाला..

धोंडे, धसांची प्रतिष्ठा आष्टीत लागली पणाला..

Next
ठळक मुद्देआष्टी  विधानसभा  मतदारसंघ : भाजपाला मताधिक्य देण्याची परंपरा राहणार कायम..

सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आष्टी विधानसभा मतदार संघाने पोटनिवडणुकीसह चार बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाला आघाडीच दिली आहे. भाजपाचा हा बालेकिल्ला असून आ.सुरेश धस आणि आ.भीमराव धोंडे यावेळी किती मताधिक्य देतात यावर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
२००४ च्या निवडणुकीत भाजपाचे प्रकाश सोळंके यांना १२ हजार ६४४ मतांची आघाडी दिली. विशेष म्हणजे राष्टÑवादीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार हे १९९९ मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडून आले तेव्हा आष्टीने त्यांना ३४ हजारांचे मताधिक्य दिले होते त्याच गायकवाडांना २००४ मध्ये राष्टÑवादीच्या तिकिटावर उभे असताना १२ हजार मतांनी पिछाडीवर ठेवले. याचाच अर्थ आष्टी विधानसभा मतदार संघ हा उमेदवारापेक्षा, जातीपातीपेक्षा भाजपाला मानतो, असा होतो. २००९ मध्येही आष्टी मतदार संघाने भाजपाच्या गोपीनाथराव मुंडेंना ३९ हजारांचे भरघोस मताधिक्य दिले होते. त्यांच्या विरोधात राष्टÑवादीचे रमेश आडसकर रिंगणात उरले होते.
२०१४ मध्ये भाजपाच्या गोपीनाथराव मुंडेंना आष्टीने पुन्हा एकदा जवळपास दहा हजारांचे मताधिक्य दिले. यावेळी राष्टÑवादीकडून स्थानिक उमेदवार आ.सुरेश धस रिंगणात उतरले होते. आ.सुरेश धस हे स्थानिकचे असल्यामुळे भाजपाचे मताधिक्य कमी झाले होते. आता तर आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, रमेश आडसकर आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांची एकत्रित ताकद ही भाजपाच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या मागे उभी राहिली असल्याने भाजपाची बाजू मागच्या चार लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक भरभक्कम झाली आहे. दुसरीकडे या चौघांच्या तोडीस तोड असे नेतृत्त्व राष्टÑवादी काँग्रेसकडे नसल्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा तुलनेत खूपच कमकुवत आहे.
युती प्लस पॉर्इंट काय आहेत?
आष्टी विधानसभा मतदार संघात आ. भीमराव धोंडे आणि आ.सुरेश धस यांचे नेटवर्क ही भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांची ताकद आहे. दोघांसोबत आता क्षीरसागरबंधू आल्यामुळे भाजपा अधिक मजबूत झाला.
युती वीक पॉर्इंट काय आहेत?
भाजपात असलेले बाळासाहेब आजबे आणि सतीश शिंदे हे आता राष्टÑवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. दोघेही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार आहेत. थोडाफार फटका भाजपाला बसू शकतो.
.....
आघाडी प्लस पॉर्इंट काय आहेत?
शरद पवार यांनी रविवारी आष्टीत जाहीर सभा घेऊन राष्टÑवादीच्या निवडणूक यंत्रणेत जीव ओतण्याचा प्रयत्न केला. या सभेमुळे थोडीफार यंत्रणा मतदारसंघात सक्रीय झाली आहे.
आघाडी वीक पॉर्इंट काय आहेत?
आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, आ.जयदत्त क्षीरसागर यांचे या मतदार संघात तगडे नेटवर्क आहे. आता क्षीरसागर हे भाजपाच्या उमेदवारासोबत असल्यामुळे भाजपाची ताकद ही दुप्पटीने वाढली आहे.

Web Title: Dhondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.