सत्ता असूनही पालकमंत्र्यांना परळीत उद्योग आणता आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:34 AM2018-09-23T00:34:47+5:302018-09-23T00:35:30+5:30

परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता केली.

Despite the power, the Guardian could not bring the industry to Parlia | सत्ता असूनही पालकमंत्र्यांना परळीत उद्योग आणता आला नाही

सत्ता असूनही पालकमंत्र्यांना परळीत उद्योग आणता आला नाही

Next
ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी डागली तोफ : परळीत राष्ट्रवादीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता केली.
१ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या मेळाव्याच्या तयारीसाठी तालुकानिहाय सुरू असलेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील हालगे गार्डनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी मुंडे बोलत होते.
२०१२ मध्ये शून्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज परळी विधानसभा मतदार संघाचा बालेकिल्ला झाला आहे. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत आपण सर्व निवडणुका जिंकल्या. आता पक्ष नेतृत्वाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची वेळ आली आहे. परळी विधानसभा मतदार संघात परिवर्तन करण्याची ताकद आहे. आपल्याला बीड जिल्ह्यातील सहाही जागा जिंकायच्या आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. बीडच्या मेळाव्यात सर्वाधिक संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन मुंडे यांनी या मेळाव्यात केले.
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नाव केंद्र शासनाच्या रेल्वे आणि पर्यटन विभागातून वगळून परळीचा आणि साक्षात वैद्यनाथाचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त करून एकवेळ विकास नाही झाला तरी चालेल, मात्र शहराचा आणि भगवंतांचा अपमान कदापिही सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. युवकांची मोठी शक्ती मेळाव्यात दिसेल, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमास बाळासाहेब आजबे, आप्पा राख, बाळासाहेब देशमुख, राजेश्वर चव्हाण, कृ.उ.बा. सभापती गोविंदराव फड, रणजित लोमटे, चंदूलाल बियाणी, डॉ. संतोष मुंडे, व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक बाजीराव धर्माधिकारी, सूत्रसंचालन गोविंद केंद्रे तर आभार प्रदर्शन प्रा. मधुकर आघाव यांनी केले. कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
निर्णायक लढाईचा लढा बीडच्या मेळाव्यातून उभारणार
४केंद्र आणि राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. महागाई वाढली, शेत मालाचे भाव पडले, अच्छे दिनच्या केवळ थापा मारणारे हे थापाडे सरकार असून, ते आपल्याला घालवायचे आहे. त्यासाठीच निर्णायक लढाईचा लढा बीडच्या मेळाव्यातून उभा केला जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्यास संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.

Web Title: Despite the power, the Guardian could not bring the industry to Parlia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.