मूल अदलाबदल प्रकरणातील दोषींना उपसंचालकांचे अभय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 07:22 PM2018-07-11T19:22:39+5:302018-07-11T19:22:57+5:30

राज्यभर गाजलेल्या जिल्हा रुग्णालयातील मूल अदलाबदल प्रकरणात दोषी परिचारिकांवर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही.

Deputy directors abducted in connection with original exchange | मूल अदलाबदल प्रकरणातील दोषींना उपसंचालकांचे अभय

मूल अदलाबदल प्रकरणातील दोषींना उपसंचालकांचे अभय

googlenewsNext

बीड : राज्यभर गाजलेल्या जिल्हा रुग्णालयातील मूल अदलाबदल प्रकरणात दोषी परिचारिकांवर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. जिल्हा रूग्णालय प्रशासनाने कारवाईचा प्रस्ताव पाठविल्यानंतरही लातूरच्या आरोग्य उपसंचालकांकडून या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्याकडूून या कर्मचाऱ्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे.

११ मे रोजी छाया राजू थिटे (रा. हिंगोली ह. मु. कुप्पा, ता. वडवणी) या महिलेने मुलीला जन्म दिला होता. परंतु रुग्णालयातील शुभांगी नाईकवाडे, सपना राठोड, संगीता बनकर, सुनीता पवार या चार परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीऐवजी मुलाची नोंद झाली. हा सर्व प्रकार २१ मे रोजी समोर आला. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरीदास यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी सर्वांचे जबाब घेतले. डॉ.थोरात यांनी यापूर्वीच डॉ. परमेश्वर बडे, डॉ. अनिल खुलताबादकर यांना कार्यमुक्त केले होते. व परिचारीकांवर कारवाईसाठी आरोग्य उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविला होता.

दरम्यान, प्रस्ताव पाठवून दीड महिना उलटला तरी अद्याप यावर कसलीच कारवाई झालेली नाही. आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे यांना संपर्क केल्यानंतर कारवाई प्रस्तावित आहे, असे सांगून या प्रकरणाला बगल दिली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आरोग्य उपसंचालकांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे.
अधिवेशनात प्रश्न उपस्थित
मूल अदलाबदल प्रकरणाचा प्रश्न अधिवेशनातही तारांकीत करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यावर बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडून माहिती सुद्धा मागविली होती. त्यांनी यामध्ये नेमकी काय माहिती दिली, हे मात्र समजू शकले नाही.
कारवाई टाळाटाळ
सूत्रांच्या माहितीनुसार डॉ. बोरसे यांना जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात भेटले आहेत. कारवाईची विचारपूसही केल्याचे सांगण्यात आले. परंतु बोरसे यांच्याकडून अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. या सर्व परिस्थितीवरून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते. आमच्या हातातील कारवाई पूर्ण केली आहे. परिचारिकांवरील कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तेच पुढील कारवाई करतील. कारवाईसंदर्भात बोललो देखील आहे. लवकरच निर्णय येईल.
डॉ.अशोक थोरात
जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
---------------
कारवाईसाठी प्रस्ताव आला आहे. त्यावर टिप्पणी ठेवली आहे. कारवाई व्हायला हरकत नाही. होईल कारवाई लवकरच.
डॉ.हेमंत बोरसे
आरोग्य उपसंचालक, लातूर

Web Title: Deputy directors abducted in connection with original exchange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड