Demonstrations before the District Collectorate on behalf of the RPI | रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ठळक मुद्देमागासवर्गीय संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही सहभाग

बीड : परळी येथील रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सचिन कागदे यांच्यावर माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्या प्रकरणी राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात रिपाइंसह इतर मागासवर्गीय संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील यावेळी आंदोलन करण्यात आले.
सर्व तालुक्यातील रिपाइंच्या विविध संघटनांनी आंदोलनात सहभागी होऊन तीव्र निदर्शने केली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन दिले.
यावेळी राजू जोगदंड, किसन तांगडे, विष्णू देवकते, प्रकाश कानगावकर, जगदीश गुरखुदे, बापू पवार, मझहर खान, विजय चांदणे, जीवन सुतार, डॉ. रमेश कैवाडे, गणेश पवार, धनंजय काळे, किशोर राऊत, प्रकाश आणेराव, राजेंद्र बन, सुरेश वडमारे, अभय मगरे, दिलीप भोसले, रणजीत सोन्नर, बालाजी पवार, अमर विद्यागर, प्रमोद शिंदे, रवि वाघमारे, अमोल धन्वे, सन्नी वाघमारे, अविनाश जोगदंड, प्रभाकर चांदणे, महेंद्र वडमारे, महेश आठवले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Web Title: Demonstrations before the District Collectorate on behalf of the RPI
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.