पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकात बोलवा, शिक्षा द्या; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:46 PM2018-08-31T13:46:24+5:302018-08-31T13:47:42+5:30

देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

The demonetization decision is failed; Citizens should call Narendra Modi for a punishment: Raj Thackeray | पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकात बोलवा, शिक्षा द्या; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकात बोलवा, शिक्षा द्या; राज ठाकरेंचा पुन्हा निशाणा

googlenewsNext

बीड : नरेंद्र मोदींचानोटबंदीचा निर्णय फसला आहे. नोटबंदीचा निर्णय जर चुकला तर मला चौकात उभे करून हवी ती शिक्षा द्या असे सांगितले होते, आता देशातील प्रत्येकाने मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

माझे ठोकताळे खरे ठरतात त्यानुसार नरेंद्र मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले. पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी बीड येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

नोटबंदीला पहिला विरोध मी केला 
मी अनेक दिवसांपासून नोटबंदी विरोधात बोलत आहे. नोटबंदी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विरोध करणारा मी एकमेव नेता होतो. आणि आरबीआय मधील नोटा जमा झाल्यानंतर, नोटबंधीचा निर्णय फसली हे स्पष्ट आहे, आता मोदी कोणत्या चौकात येणार आहेत, तुम्ही आमच्या चौकत येता की बाजूच्या हे देशाने मोदींना विचारले पाहिजे. 

एकत्र निवडणुका कशासाठी 
एव्हीएमच्या तसेच एकत्र निवडणुकांच्या विषयावर देखील राज ठाकरेंनी टीका केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ' एकत्र कशासाठी, तुमचे होऊ घातलेले पराभव झाकण्यासाठीच का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला, उद्या पुन्हा कोठे त्रिशंकू परिस्थिती उद्भवली तर काय करणार, पुन्हा निवडणूक घेत राहणार का ? तुमचे पराभव झाकण्यासाठी देश निवडणुकीच्या रांगेत उभा करणार का ? असे ही ते यावेळी म्हणाले. 

मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात 
इव्हीएमद्वारे निवडणूक पद्धत साऱ्या जगाने रद्द केली त्याचा हट्ट कशासाठी ? तुम्ही काय साधणार आहात ?  असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. इव्हीएमचे प्रताप साऱ्या देशाने पाहिले असून आता जुन्या पद्धतीने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची त्यांनी मागणी केली. 

इव्हीएममुळे भाजप विजयी 
मतदान यंत्रे सत्ताधाऱ्यांच्या हाती असतील तर निवडणूक लढवायच्या कशासाठी असेही ठाकरे म्हणाले. ईव्हीएम सत्ताधाऱ्यांच्या हातात पुढील निवडणुका पटपत्रिकेवर घेण्यात याव्यात यासाठी सर्व पक्षाने एकत्र आले पाहिजे, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे, ईव्हीएम मुळेच भाजपचे उमेदवार निवडून येतात अशी टीका ठाकरे यांनी केली. 

Web Title: The demonetization decision is failed; Citizens should call Narendra Modi for a punishment: Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.