धस, धोंडे, दरेकर एकत्र राहिल्याने आष्टीत भाजपला मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:15 AM2019-05-26T00:15:23+5:302019-05-26T00:15:29+5:30

बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदार संघातील मतदारांनी परत एकदा भाजपच्या डॉ. प्रीतम यांना कौल देत ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले.

Das, Dhonday, Darekar got together and BJP got strength | धस, धोंडे, दरेकर एकत्र राहिल्याने आष्टीत भाजपला मिळाले बळ

धस, धोंडे, दरेकर एकत्र राहिल्याने आष्टीत भाजपला मिळाले बळ

Next
ठळक मुद्देआष्टी विधानसभा मतदार संघ। रस्ते, जलसंधारण, रेल्वे इत्यादी विकास कामाची मिळाली पावती; राकाँच्या आघाडीला मोठा ब्रेक

अविनाश कदम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदार संघातील मतदारांनी परत एकदा भाजपच्या डॉ. प्रीतम यांना कौल देत ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्टÑवादीचे नेते सुरेश धस यांना भाजपात सामील करुन बीड-लातूर- उस्मानाबाद विधान परिषदेचे आमदार केले. त्यामुळे आष्टी मतदार संघावर भाजपने वर्चस्व निर्माण केले. विशेष म्हणजे ज्या थ्रीडीभोवती मतदार संघाचे राजकारण फिरत राहिले ते आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर या तिघांची शक्ती भाजपला पाठबळ देणारी ठरली. त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभा घेत मतदार संघ ढळवून काढला. पूर्ण शक्ती पणाला लावली. परंतू मतदारांनी राष्टÑवादीच्या आघाडीला मोठा ब्रेक लावला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही याच मतदार संघाकडे असल्यामुळे डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.
आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे. अनेक गावांत झालेली रस्त्याची कामे, जलसंधारण व रेल्वे अशी विविध विकास कामे झाली. तर धोंडे, धस या दोन्ही आमदारांनी मतदार संघात विकास कामे खेचून आणण्यात चढाओढ झाली. तसेच जिल्हा परिषद व आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील नगर पंचायत व पंचायत समिती सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असल्याने त्याचाही लाभ भाजपला या निवडणुकीत झाला.
असे झाले मतदान
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ६९ हजार ५३८ मतदार आहेत. तर त्यापैकी २ लाख ४३ हजार ४५५ एकूण मतदान झाले.
यापैकी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना १ लाख ४७ हजार ८४० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ७७ हजार ९९७ आणि बहूजन वंचित आघाडीचे विष्णू जाधव यांना ६ हजार ७५७ मते मिळाली.
अपक्ष उमेदवारांमध्ये संपत चव्हाण यांना १ हजार १७३, मुजीब इनामदार यांना १ हजार ९९ मते मिळाली. दोघे वगळता ३१ अपक्षांना चार अंकी संख्या गाठता आली नाही.

दुरंगी लढतच
डॉ. प्रीतम मुंडे यांना २ लाख ४३ हजार ४५५ एकूण मतदान झाले. तर बजरंग सोनवणे यांना ७७ हजार ९९७ एवढे एकूण मतदान झाले. तर आष्टी मतदार संघातून डॉ. प्रीतम मुंडे यांना ७० हजार ३४४ मतांची आघाडी इतर विधानसभा सभा मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक मिळाली.

Web Title: Das, Dhonday, Darekar got together and BJP got strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.