Crisis of bollworm; Farmer took off 10 acres of cotton in Majalgaon | बोंडअळीचे संकट; माजलगावात शेतक-याने १० एकर कापूस उपटला 

ठळक मुद्देयावर्षी तालुक्यात खरीप हंगामात ३७ हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. कापसाच्या पहिल्या वेचणीनंतर पिकावर गुलाबी सेंद्रिय बोंडअळीने आक्रमण केले आहे.

बीड : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील  मुंजाबा जाधव या शेतक-याने १० एकरात मोठ्या आशेने लावलेल्या कापसाचे पीक बोंडअळीला वैतागून उपटून टाकायला सुरुवात केली आहे. मंगळवारी पवारवाडी शिवारात हे चिंता जनक दृष्य पहावयास मिळाले. 

यावर्षी तालुक्यात खरीप हंगामात ३७ हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु; कापसाच्या पहिल्या वेचणीनंतर पिकावर गुलाबी सेंद्रिय बोंडअळीने आक्रमण केले आहे. यामुळे शेतक-याने केलेला खर्चही कापूस उत्पादनातून निघणेही अवघड झाले आहे. 

सध्या कापसाला ७० ते ८० बोंडे आहेत. मात्र, कापसावर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे या परिसरातील कापूस उत्पादक  शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी मुंजाबा कडाजीराव जाधव यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला वैतागून दहा एकर कापूस उपटून टाकला आहे. आधीच बाजारात कापसाला मिळणारा भाव कमी आहे. त्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीत भर पडली. कृषी विभागाने तात्काळ पिकांची पाहणी करुन पंचनामे करुन  कापूस उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. 

बोंडअळीचा पांढ-या सोन्याला ‘बट्टा’
यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करण्यात आली. पहिल्या वेचणीनंतर कापसावर बोंडअळीने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकºयांना केलेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. याला वैतागून पवारवाडी येथील शेतकरी मुंजाबा जाधव यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला वैतागून १० एकर कापूस उपटून टाकला. कृषी विभागाने पंचनामे करुन कापूस उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतक-यांमधून केली जात आहे.


Web Title: Crisis of bollworm; Farmer took off 10 acres of cotton in Majalgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.