लाच प्रकरणातील अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 09:25 PM2019-02-21T21:25:14+5:302019-02-21T21:28:22+5:30

२ फेब्रवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी लाच घेताना रंगेहात पकडले

Collector Baburao Kambale suspended in the bribe case | लाच प्रकरणातील अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे निलंबित

लाच प्रकरणातील अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे निलंबित

googlenewsNext

बीड : जिल्हा पुरवठा विभागातील धान्य घोटाळ््याप्रकरणी सोयीस्कर निकाल देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे व बीड तहसीलमधील अव्वल कारकुन महादेव महाकुडे यांनी ५ लाखाची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना २ फेब्रुवारी रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सूनावली होती. ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

बीड तहसील पुरवठा विभागातील गोदामामधून १४ हजार ५०० क्विंटल धान्याचा अपहार करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरुन अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली होती. २०१३ पासून गोदामातून दुकानदारांनी उचलेले धान्य व केलेल्या अपहारासंदर्भातील अहवाल १९ जानेवारी रोजी बी.एम.कांबळे यांच्याकडे दिला होता. या घोटाळ््याप्रकरणी दोषी ठरवलेल्या तीन कर्मचा-यांनी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यामार्फत आपण या घोटाळ््यात नसल्याचे तसेच या प्रकरणाची मुळ कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे अहवाल वरिष्ट पातळीवर पाठवताना सोयीस्कर देण्यात यावा असे मागणी केली होती. मात्र यावेळी तोडगा निघाला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

त्यानंतर तहसील विभागातील अव्वल कारकून महादेव महाकुडे यांच्या मार्फत हे प्रकरण मिटवण्यासाठी १० लाखा रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र त्यानंतर ५ लाख देण्याचे ठरले, या प्रकरणात दोषी असलेल्या एका कर्मचाºयाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार ३१ जानेवारी रोजी दिली होती. त्यानूसार २ फेब्रवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. कांबळे व महाकुडे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना विशेष न्यायालय बीड यांच्यासमोर हजर केले त्यावेळी न्यायालयाने त्यांना २ दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली होती. १३ फेब्रवारी रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला. शासनाच्या नियमानूसार ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडी भोगलेल्या अधिकाºयाला निलंबीत करण्यात येते. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

कांबळेंकडे करोडो रुपयांची संपत्ती 
या प्रकरणानंतर एसीबीने अपर जिल्हाधिकारी कांबळे यांच्या घरांवर छापे मारुन झाडाझडती घेतली होती. यामध्ये कांबळे याच्याकडे नांदेड येथे घर, औरंगाबाद येथे दोन घरं व दोन भुखंड ,४० तोळे सोनं, फर्निचरसह जवळपास ३५ लाख रुपयांचे साहित्य, बँकेत २० लाख, तसेच ६० लाख रुपयांची मदत ठेवींसह करोडो रुपयांची संपती आढळून आल्याची सूत्रांची माहिती आहे. एसीबीकडून मात्र अद्याप याबद्दल खूलासा करण्यात आलेला नाही. 

महाकुडे देखील होणार निलंबित
या प्रकरणातील मुख्य आरोपी अप्पर जिल्हाधिकी बी.एम.कांबळे यांच्यावर कारवाई झालेली नसल्यामुळे सहआरोपी महेदेव महाकुडेला देखील निलंबित करण्यत आलेले नव्हते. मात्र, कांबळे निलंबित झाल्यामुळ महाकुडे याला देखील निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Collector Baburao Kambale suspended in the bribe case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.