विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:59 PM2019-01-22T23:59:03+5:302019-01-22T23:59:42+5:30

जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या विषय समितीसह सभापतींच्या निवडी गुरुवारी पार पडल्या.

The choice of the subject committees is unconstitutional | विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

Next
ठळक मुद्देबीड नगराध्यक्ष गटाकडे चार, एमआयएमला दोन तर काकू नाना आघाडीकडे पदसिद्ध सभापतीपद

बीड : जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या विषय समितीसह सभापतींच्या निवडी गुरुवारी पार पडल्या.
बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर ,मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर,पिठासीन अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडीत स्वच्छता सभापतीपदी काकू नाना आघाडीचे हेमंत क्षीरसागर तर बांधकाम सभापतीपदी बीड शहर विकास आघाडीचे सय्यद सादेक अली , महिला व बालकल्याण सभापतीपदी पुजा गणेश वाघमारे, शिक्षण सभापती पदी सय्यद इलीयास हमीद यांची निवड झाली. एमआयएमच्या शेख सुलताना बेगम शेख चांद यांची पाणी पुरवठा तर नियोजन सभापतीपदी बिसमिल्लाबी पाशामियां यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी शहर विकास आघाडीच्या पिंगळे सुभद्रा बाजीराव यांची वर्णी लागली. स्थायी समितीवर शहर विकास आघाडीचे भास्कर जाधव, एमआयएमचे शेख मोहम्मद खालेद, काकू नाना आघाडीचे अमर नाईकवाडे यांची निवड झाली.
दरम्यान, एमआयमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी ‘व्हीप’ जारी करुन तटस्थ राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र राजकीय डावपेचात नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची खेळी यशस्वी ठरली. एमआयएमला २ सभापतीपद देत शहर विकास आघाडीकडे ४ सभापती पदे राखण्यात यश आले.

Web Title: The choice of the subject committees is unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.