चिंचोटीत २ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:17 AM2018-11-15T00:17:09+5:302018-11-15T00:17:48+5:30

तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकरी भगवान कडाजी गोंडे यांच्या शेतातील दोन एकर ऊस जाळून खाक झाला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे.

In Chinchotti, 2 acres of sugarcane is burnt by short circuits | चिंचोटीत २ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

चिंचोटीत २ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकरी भगवान कडाजी गोंडे यांच्या शेतातील दोन एकर ऊस जाळून खाक झाला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे.
ग्रामीण भागात महावितरणाच्या विद्युत वाहिण्या जुन्या व अक्षम बनल्या आहेत. लोंबकळणाऱ्या तारांमुळे अनेक ठिकाणी पिके जळून खाक होत आहेत. शार्टसर्किटच्या वाढत्या घटना घडल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चिंचोटी शिवारातून वीज वितरणाचे खांब काही शेतकºयांच्या जमिनीतून गेलेले आहेत. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भगवान कडाजी गोंडे यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारेमध्ये घर्षण झाले. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जाळ झाला आणि त्यांच्या उसाला आग लागली. त्यामुळे या आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतकºयाचे लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: In Chinchotti, 2 acres of sugarcane is burnt by short circuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.