Break the main gate in Majalgaon; Lipa | माजलगावात मुख्य गेट तोडून घडफोडी;  दिड लाखाचा ऐवज लंपास

माजलगाव (बीड ) :  येथील इंदीरा नगर परिसरातील दत्ता सुर्यभान गायकवाड यांच्या घराचे चँनल गेट तोडून घरातील साडे चार तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना दि 24 च्या मध्यराञी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, इंदिरा नगर परिसरातील दत्ता सुर्यभान गायकवाड हे नेहमी प्रमाणे रविवार रोजी घराचे मेन गेटला कुलूप लावून झोपले असता. समोरील गेटचे चँनल गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन स्वयंपाक घरात प्रवेश करुन कपाट तोडून त्यातील छोट्या डब्यातील सोनेच्या पाच अंगठ्या (29 ग्रँम ),नेकलेस 12 ग्रँम,झुंबर 4ग्रँम असे एकूण 45 ग्रँम (किंमत दिड लाख ) माल चोरट्यांनी लंपास केला.

हा प्रकार सकाळी उठताच गायकवाड यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क केला.या बाबत दत्ता गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांन विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआय मारोती शेळके हे करत आहेत.