The body of the missing son found in the Majalgaon dam | बेपत्ता तरूणाचा मृतदेह माजलगाव धरणात सापडला
बेपत्ता तरूणाचा मृतदेह माजलगाव धरणात सापडला

ठळक मुद्देघातपात की आत्महत्या ? : पालकांनी केली होती हरवल्याची तक्रार

माजलगाव : बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर गेलेल्या तरूणाचा मृतदेह माजलगाव धरणात मंगळवारी सकाळी आढळून आला. या तरूणाच्या पालकाने रविवारी रात्री शहर पोलिसात हरवल्याची तक्र ारही दाखल केली होती. मंगळवारी अचानक मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
चंद्रकांत बाजीराव राठोड (वय २४, रा.गजानन नगर) हा डी.फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता मी बाहेर जाऊन येतो, असे म्हणून बाहेर गेला. परंतु तो घरी आला नाही. त्यामुळे दिवसभर व रात्री वाट पाहून नातेवाईकांनी त्याला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा संपर्क होत नसल्याने रविवारी रात्री तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात त्याचे वडील बाजीराव चारू राठोड (शिक्षक) यांनी केली होती.
त्याच बेपत्ता तरुणाचा माजलगाव धरणात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी सकाळी फोनवरून मिळाली.
घटनास्थळी पोलिसांना सदरील तरु णाचे कपडे धरण काठावरील दगडावर मिळून आले. त्यामुळे संबंधित तरु णाचा पोहताना बुडून मृत्यू झाला, की त्याने आत्महत्या केली, की त्याचा घातपात झाला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तरूणाच्या शरीरावर ओरबाडण्याच्या तसेच मुका मार दिल्याचा खुणा दिसत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतरच खरा प्रकार स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत
आहेत.


Web Title: The body of the missing son found in the Majalgaon dam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.