अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेलिंगची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:29 AM2019-01-16T00:29:42+5:302019-01-16T00:30:05+5:30

दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याप्रकरणी एका तरूणाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याप्रकरणी एका तरूणाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Blackmail complaint by filing obscene photos | अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेलिंगची तक्रार

अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेलिंगची तक्रार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याप्रकरणी एका तरूणाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजिनाथ खेडकर असे ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. पीडितेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. याचाच फायदा घेऊन गावातीलच एका २५ वर्षीय तरूणाने महिला आणि तिच्या पतीचे फोटो आपल्या मोबार्ईलमध्ये घेतले. त्यानंतर हेच फोटो पीडितेला दाखवून शरीर संबंधाची मागणी केली. पीडितेने नकार देताच त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत सर्व फोटो पीडितेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविले. त्यामुळे बदनामी झाल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अजिनाथ विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. शिरूरचे सपोनि महेश टाक यांनी गुन्हा दाखल केला. तर तपास पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.
रिक्षातून प्रवास करणाºया मजुरास लुटले
बीड : रात्रीच्या सुमारास टोकवाडी येथून परळीकडे येण्यासाठी रिक्षातून निघालेल्या मजुरास रिक्षा चालकासह चौघांनी बेदम मारहाण करून त्याचे ११ हजार ५०० रुपये लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. विश्वनाथ तानाजी तोरडमल (रा. हमालवाडी, परळी) हा मजूर रात्री ९.३० वाजता ते टोकवाडी येथून परळीकडे येण्यासाठी काळे याच्या रिक्षात बसला. परळीच्या उड्डाणपुलावर उतरण्यासाठी तोरडमल यांनी रिक्षा थांबविला. खिशातील रोख ११ हजार ५०० रुपयांचे बंडल वर काढून त्यातून भाडे देताना रिक्षात बसलेल्या तिघांनी तोरडमल यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून टोकवाडीच्या दिशेने जाण्यास काळे यास सांगितले. टोकवाडीजवळ त्यांनी तोरडमल यांना मारहाण करून रक्कम लुटून धमक्या देत निघून गेले. याप्रकरणी विश्वनाथ तोरडमलच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक काळे व अन्य तिघांवर संभाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Blackmail complaint by filing obscene photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.