भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:15 AM2019-02-24T00:15:19+5:302019-02-24T00:16:37+5:30

आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची नाही असे विधान करत यात्रा आयोजकांचा समारोप होईल असे विधान केले होते. त्यावर शनिवारी धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.

BJP's Mastwal power will be concluded: Dhananjay Munde | भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे

भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस - राष्ट्रवादीची परळीत संयुक्त सभा : सत्ता परिवर्तनाची वज्रमूठ आवळली

परळी : आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची नाही असे विधान करत यात्रा आयोजकांचा समारोप होईल असे विधान केले होते. त्यावर शनिवारी धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस आयच्या संयुक्त जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, आ.रामराव वडकुते, पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, रजनी पाटील, सुमन आर.आर.पाटील, पद्मसिंह पाटील, फौजिया खान, चित्रा वाघ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे, राजिकशोर मोदी, सुरेश नवले, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, सिराजभाई, गोविंद देशमुख, बजरंग सोनवणे, प्रा.सुषमा अंधारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्याउपस्थितीत अंबाजोगाईतील भाजपाचे दत्ता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकाºाांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा समारोप करू, असे बहिणबाई बोलल्या. राष्ट्रवादी काँग्रेस संपवणे चिक्की खाण्याइतके सोपे नाही. लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत समोरासमोर या बघू कोण संपतंय असे आव्हान त्यांनी दिले.
मुंडे म्हणाले, सरकारने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे उसतोड कामगार महामंडळ बनवले जाईल अशी घोषणा केली. मी दुर्बिण लावून शोधलं पण ऊसतोड कामगारांचं महामंडळ काही सापडले नाही, ते महामंडळच रद्द केले. हा अपमान असल्याचे ते म्हणाले.
आमच्या वाटेला जाऊ नका. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. अमित शाह तडीपार आहे, तुम्ही कोणावर आरोप करता ? आधी १६ मंत्र्यांच्या जे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले आहे त्याची चौकशी करा असा टोला त्यांनी लगावला.
मोदींच्या काळात ७३१ जवान शहीद झाले
४सभेदरम्यान छगन भुजबळ म्हणाले, मी काही घाबरणारा नेता नाही. हे सरकार शहीद जवानाच्या नावावर राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दहशतवादी हल्ल्यांनी देश दु:खी असताना भाजपवाले राम मंदिर वही बनाएंगे असे म्हणतात, अशी टीका भुजबळ यांनी केली. मोदींच्या काळात ७३१ जवान शहीद झाले. सीमेवरील जवानही भाजपच्या काळात सुरक्षित नाही. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे भुजबळ म्हणाले. देशातील सीबीआयसारख्या संस्था भाजप सरकारने मोडकळीस आणल्या. माध्यमांची कोंडी केली जाते. मोदी यांची मन की बात नौटंकी आहे. चहा विकला असे सांगणाऱ्या मोदींनी चहाप्रमाणे देश विकू नये असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: BJP's Mastwal power will be concluded: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.